tag:blogger.com,1999:blog-33852973.post1602208432557186661..comments2024-01-17T02:34:11.457-08:00Comments on उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म: साबुदाणा खिचडीrohini gorehttp://www.blogger.com/profile/02268269579791187768noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-33852973.post-77000833992977718322008-08-06T08:49:00.000-07:002008-08-06T08:49:00.000-07:00तुझ्या खिचडीवरून मलाही एक आठवण झाली. मी प्राथमिक श...तुझ्या खिचडीवरून मलाही एक आठवण झाली. मी प्राथमिक शाळेत असताना कसलासा उपवास होता. कोणीतरी आजारी असल्यामुळे आई त्यांना भेटायला बाहेरगावी गेलेली होती. माझे काका आणि आम्ही भावंडे घरी होतो. त्यांना स्वयंपाकातील तसे बरेच काही माहित होते पण खिचडी कशी करतात ? माहित नव्हते. मी म्हटले,"एकदम सोप्पी असते.मी सांगते." नेहमीप्रमाणे केले सगळे पण आईच्या खिचडीला जो पिवळसर रंग येतो तो काही आला नाही. मग एकदम ट्यूब पेटली. हळद राहिली ना ? मग हळद टाकली तर वेगळाच रंग आला. पण हळद जास्त झाल्यामुळे आला असेल अशी समजूत घालत आम्ही ती हळदीची खिचडी उपवासाला खाल्ली. आईने आल्यानंतर हळद उपवासाला चालत नाही म्हटल्यावर काकांनी माझ्याकडे ’पुन्हा तुझे स्वयंपाकातील काहीही ऐकणार नाही’ अश्या अर्थी कटाक्ष टाकला...आता खिचडी परतल्यानंतर जेव्हा तो पिवळसर रंग येतो तेव्हा मला हमखास या घटनेची आठवण येते....Anonymousnoreply@blogger.com