tag:blogger.com,1999:blog-33852973.post2085198958120840276..comments2024-01-17T02:34:11.457-08:00Comments on उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म: गुलाबजामrohini gorehttp://www.blogger.com/profile/02268269579791187768noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-33852973.post-92105270499831536792011-10-22T23:51:50.287-07:002011-10-22T23:51:50.287-07:00रोहिणी ताई.. अगं अगदी सेम अनुभव माझ्याही गाठीशी आह...रोहिणी ताई.. अगं अगदी सेम अनुभव माझ्याही गाठीशी आहे.. मला गुलाबजाम खूप आवडतात. म्हणून मी स्वतःलाच करता यायला पाहिजे म्हणून करायचे मनात ठरवले. माझी एक मामी खूपच सुगरण आहे. तिच्याकडे एकदा गुलाबजाम खाण्याचा योग आला. तिने अतिशय सुरेख केले होते गु.जा(तिनेच टोपण नावही सांगितले मला). मी तिच्याकडून नीट रेसिपी विचारून घेतली आणि आईला सांगून एकदा गु.जा चा पहिला प्रयोग केला. पार सपशेल तो आपटला. गुलाबजाम नीट तळल्या गेले, पाकात सोडले पण दुसऱ्या दिवशी भांडे पाहिले तर सगळेच्या सगळे गु.जा पाकात विरघळून गेले होते. ते गोड मिश्रण झाले होते. मी आणि बाबांनी त्याला हिरमुसून आपलेसे केले. मग आणखीच जिद्दीने पेटून मामीकडून अक्षरशः बारकाव्यासहित कृती लिहून आणली. तीत रवा मैदा होता. अगदी तुझीच हिस्टरी इथेही रिपीट. पण तीही फसली. मग आईचे ऐकून खवा वगैरे विकत आणून गु.जा बनवले. पण त्यात पाक घुसेना.. सगळे रागावले. आता पुन्हा प्रयोग नाही म्हणून ठरवून टाकले. आता लग्न-नंतर परत तो प्रयोग करून पाहावा म्हणून मनात आले. मग बाजारातून गिट्स चे पाकीट आणून एक प्रयोग केला. तो जमला कि नाही सांगत येणार नाही. कारण गुलाबजामांनी इतका पाक पिला कि गुलाबजाम बसल्या जागी झोपून गेले होते ! नवरा पोट धरून हसला. पण आता तर हद्दच झाली. आता ठरवले आहे. गुलाबजाम मी आता कधीच करून पाहणार नाही. मला यश आले नाही. पण तुझी हि पोस्ट वाचून निदान तुला तरी यश आले, यातच मला समाधान वाटते आहे.<br /><br />- सौ. अवनीसौ. अवनी अंकुर राजोपाध्येhttps://www.blogger.com/profile/08997253610742865477noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33852973.post-1113197914915971522010-07-13T11:02:27.725-07:002010-07-13T11:02:27.725-07:00paathav tujhi gulabjam chi recipe mag..mi hi karun...paathav tujhi gulabjam chi recipe mag..mi hi karun baghen...Shravaninoreply@blogger.com