Wednesday, April 11, 2007

कणीस कीस

वाढणी:१ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

कोवळी मक्याची मध्यम आकाराची कणसे ४
मिरच्यांचे बारीक तुकडे २-३
कोथिंबीर २ चमचे, ओला नारळ २ चमचे,
दाण्याचे कूट मूठभर, मीठ, साखर अर्धा चमचा
तेल 4 चमचे, मोहरी, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन:

मक्याची कोवळी कणसे किसून घ्या. तेलाच्या फोडणीमध्ये मिरच्यांचे तुकडे घालून नंतर त्यात किसलेला मक्याचा कीस घाला. २-३ वाफा देवून शिजवा. वाफ देताना झाकण काढल्यावर हा कीस परतून घ्या.  नंतर त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर, ओला नारळ, साखर व चवीप्रमाणे मीठ घालून परत २-३ वाफा देवून परता. हा कीस पौष्टीक आहे. ४ कणसांच्या कीसामध्ये एका वेळेला एकासाठी पोटभर होतो.





2 comments:

  1. Anonymous4:07 AM

    माझे नुकतेच डिसेंबर मध्ये लग्न झाले.
    मुलगी बॅंगलुर ची! कानडी!
    तिला मराठी स्वायपक अजिबात येत नाही... आणि मला थोडा फार येतो.
    मी सध्या सिंगापुर मध्ये आहे आणि काही महिन्यनंतर पुण्याला घरी परत जाणार आहे, तोपर्यंत तिला थोडाफार जरी शिकवता आला तर बर!

    अशातच तुमचा ब्लॉग वाचण्यात आला! अप्रतिम...
    आता मला खात्री आहे की ब्लॉग वाचून ती बराच काही बनवायला शिकेल..आणि मग सासूबाई खुश!
    धन्यवाद!

    ReplyDelete
  2. Thanks a lot Santosh!!

    ReplyDelete