Thursday, July 02, 2009

सातुचे पीठ

जिन्नस :

गहू २ वाट्या
हरबरा डाळ १ वाटी
उडीद डाळ अर्धी वाटी

मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात वरील धान्य खमंग भाजून घ्या. गार झाले की गिरणीतून दळून आणा. थोडे रवाळ दळा.

वरील पीठात दूध साखर/गुळ घालून मिक्स करून तसेच खातात. छान लागते. पौष्टीक आहे. लाडू करायचे झाल्यास खालीलप्रमाणे करा.

वरील दळून आणलेले पीठ परत एकदा साजूक तूपावर खमंग भाजा. पीठ भाजून झाले की जेवढे पीठ घ्याल तेवढाच गूळ घाला व त्याचे लाडू वळा. हे लाडू पण चविष्ट लागतात.

14 comments:

nimisha said...

रोहीणी,आज तुझी ही सातुच्या पीठाची क़ृती वाचून मला लहानपणची माझ्या आजीची एक खमंग रेसिपी आठवली,ती इथे मला इथे आज शेयर करायला आवडेल..
या सातुच्या पिठांत थोडं लाल तिखट,मीठ,कोथिंबीर,आणि कैरीचं गुळाचं गोड लोणचं,हे सर्व घालायचं आणि नंतर काकडी सोलून तिच्या बोटभर लांब फोडी करायच्या आणि या तयार केलेल्या पीठांत त्या घोळून घ्यायच्या जेणेकरून त्यांना सर्व बाजुंनी पीठ लागेल.....बस्स आणि मग चवी-चवीने एकेक खमंग फोड खायची...हा खास नागपूर,विदर्भातला प्रकार आहे.

bhaanasa said...

रोहिणी, माझ्या सासरी सातुचे पीठ बरेचदा खाल्लेय. छान लागते. मला लाडू जास्त आवडतात. आता तुझ्या कृतीने इथे करून पाहते.:)

Mugdha said...

निमिषा म्हणतेय त्या पदार्थाचे नाव "काकडी पीठ" आहे...
एकदम खमंग आणि छान पदार्थ...
सातु पिठ कसं करायचं हे सांगितल्याबद्दल धन्यवाद...(आजीने दिलेलं सातुपीठ संपत आलंय..आता मलाच करणं भाग आहे;) )

rohini gore said...

Nimisha, mugdha, aani bhagyashri pratisadabaddal anek dhanyawaad!! nimisha ek navin prakar sangitlyabaddal aabhar. bhagyashri satuche pith mi ithe karun pahile nahi kadhi. tu keles ki malahi sang kase jhale te. Thanks

Sanjay Kathale said...

छान आजीची आठवण झाली

rohini gore said...

Thank you!

angelia said...

is it possible grinding at home?

Angelia said...

is it possible grinding at home?

Dhanshree said...

Thankss I dnt hv my granny nw... bt love SATUCHE PITH a lot.... ata aai la banavayala sangen... :) thank you so much...

Subodh Deshpande said...

सातूच्या पीठाच्या पोळ्या, भाकरी सदरुश्य पदार्थ करता येतील काय ? जेणे करून असे पीठ नित्य वापरात राहील

shree said...

USA madhe satuche mishran dalun kuthe milel ?

rohini gore said...

shree,, ithe dalta yeil, pan tyala high power mixer hava, tari suddha hoil ka te mahit nahi, he sarv india trip madhe karun aanave,, subodh deshpande,, ya pithachi bhakri vagere changli lagel ka? :( thanks all ! :)

Unknown said...

rohini tai...Good shearing through this blog. thanks

rohini gore said...

Thanks so much for your comment !