वाढणी:१ जण
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस:
कोवळी मक्याची मध्यम आकाराची कणसे ४
मिरच्यांचे बारीक तुकडे २-३
कोथिंबीर २ चमचे, ओला नारळ २ चमचे,
दाण्याचे कूट मूठभर, मीठ, साखर अर्धा चमचा
तेल 4 चमचे, मोहरी, हिंग, हळद
क्रमवार मार्गदर्शन:
मक्याची कोवळी कणसे किसून घ्या. तेलाच्या फोडणीमध्ये मिरच्यांचे तुकडे घालून नंतर त्यात किसलेला मक्याचा कीस घाला. २-३ वाफा देवून शिजवा. वाफ देताना झाकण काढल्यावर हा कीस परतून घ्या. नंतर त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर, ओला नारळ, साखर व चवीप्रमाणे मीठ घालून परत २-३ वाफा देवून परता. हा कीस पौष्टीक आहे. ४ कणसांच्या कीसामध्ये एका वेळेला एकासाठी पोटभर होतो.
Showing posts with label कणीस पदार्थ. Show all posts
Showing posts with label कणीस पदार्थ. Show all posts
Wednesday, April 11, 2007
Subscribe to:
Posts (Atom)
