चिरलेली कोथिंबीर ३ ते४ मुठी (कोथिंबीर देठासकट चिरून पाण्याने धुवा व रोळीत निथळत ठेवा)
लाल तिखट १ चमचा
धनेर्जिरे पूड १ चमचा
अर्धा चमचा हळद
चवीपुरते मीठ
हरबरा डाळीचे पीठ थोडेसे
चिरलेला कांदा थोडासा
कोथिंबीरीतले पाणी सर्व निथळू दे. नंतर एका ताटात चिरलेली कोथिंबीर व कांदा
घ्या. त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, हळद व मीठ घाला. नंतर त्यात मावेल तितके
डाळीचे पीठ घाला व सर्व मिश्रण एकत्र करा. नंतर अगदी थोडे पाणी घालून पीठ
कालवा व गोळा करून घ्या. नंतर तव्यावर तेल घाला व सर्व बाजूने पसरा व त्यावर पिठाचा गोळा ठेवून
थालिपीठ थापून घ्या. मध्यम गॅसवर तवा तापत ठेवा व दोन्ही बाजूने खरपूस
भाजा. खुसखुशीत व कुरकुरीत थालिपीठ तयार होईल. पीठ कालवून त्याचा गोळा करून
झाला की १० मिनिटांनी थालिपीठ करा. हा थालिपीठाचा तयार झालेला गोळा थोडासा
सैलसर होईल व थालिपीठ छान होईल. टोमॅटो केच अप बरोबर चविष्ट थालिपीठ खा.
Friday, May 01, 2026
कोथिंबीरीचे थालिपीठ
Subscribe to:
Posts (Atom)
