Thursday, May 17, 2007

डाळं लाडूपाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

डाळं ३ वाट्या पीठ होईल इतके
पीठीसाखर दीड वाटी
साजूक तूप १० चमचे

क्रमवार मार्गदर्शन: ३ वाट्या पीठ होईल इतके डाळं घेणे. मिक्सर/ग्राइंडर मधून बारीक करून घेणे. नंतर त्यात साजूक तूप व साखर घालून हाताने/चमच्याने एकसारखे ढवळून मग त्याचे लाडू वळणे. ३ वाट्यांमधे साधारण १२ ते १५ लाडू होतात. वर साखरेचे व तुपाचे प्रमाण दिले असले तरीही साखरेचे प्रमाण ज्याप्रमाणात गोड आवडते त्या प्रमाणात. आणि तूपही लाडू वळतील इतपत घालणे. जी वाटी पीठाचे प्रमाण घ्यायला वापरतो तीच साखर घ्यायला वापरणे.
डाळं म्हणजे आपण जे चिवड्यात घालतो ते आहे.

6 comments:

Dr.Aparna S. Pattewar said...

chan recipe ahe.
dal mhanje dalv ka? je apan chiwda madhe takto.
thax for sharing this :=)

nikte said...

can u give some non veg recipes

rohini gore said...

nikte, sorry yaar!! mi non veg ajibatach khat naslyamule recipes deoo shakat nahi. pan tumhi orkut var H4 mandalat gelat ki tithe recipes chya section madhe tumhala non veg pak kruti distil.

rohini gore said...

aparNa, dal mhane dalia je aapan chivdyat ghalto te. thanks for comment.

mini said...

Rohini tai Namaskar...tumhi dal(dalia) lihl ahe...mhaje bhajlele chanyanchi daal ka...majha doubt clear kara plz..khub chhan recipe ahe mi nakki try karnar

rohini gore said...

मिनी, ही डाळ आहे ती म्हणजे बाजारात विकत मिळते ना ती. त्याला डाळं म्हणतात. ळ वर अनुस्वार.हे डाळं पातळ पोह्यांच्या चिवड्यात पण घालतात. हे लाडू गूळ घालून पण छान लागतात. खमंग. किंवा गुळ साखर दोन्ही घालून सुद्धा. अभिप्रायाबद्दल धन्यवाद मिनी! करून पहा. नक्कीच आवडतील.भाजलेली चण्याची डाळच पण घरी भाजलेली नाही.