जिन्नस :
किसलेले आले २ वाट्या
साखर २ वाट्या
ricotta cheese (fat 9g) 1 वाटी अथवा 1 वाटी किसलेला खवा
साजूक तूप पातळ करुन 2 चमचे
साखर २ वाट्या
ricotta cheese (fat 9g) 1 वाटी अथवा 1 वाटी किसलेला खवा
साजूक तूप पातळ करुन 2 चमचे
एका पातेल्यात साखर व किसलेले आले एकत्र एकसारखे करून घ्या. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवा. ती तापली की त्यात थोडे साजूक तूप घाला व एकत्रित केलेले आले व साखर यांचे मिश्रणही घाला. हळूहळू साखर वितळायला लागेल. आता आच थोडी वाढवा. काही वेळाने साखर वितळून हे मिश्रण उकळायला लागेल. आता खवा अथवा रिकोटा चीझ घालुन एकसारखे सारखे ढवळत रहा.
काही वेळाने हे सर्व मिश्रण शिजून कोरडे पडायला लागेल व गोळा बनायला लागेल. अधूनमधून कालथ्याने ढवळत रहा. थोड्यावेळाने गॅस बंद करून हे मिश्रण थोडे कालथ्याने घोटून घ्या व नंतर लगेच एका ताटलीत काढा. या ताटलीला आधी थोडा तूपाचा हात लावून घ्यावा. ताटलीत मिश्रण ओतल्या ओतल्या त्यावर तूपाचा हात लावलेला एक पसरट प्लॅस्टीकचा कागद ठेवून सर्वबाजूने एकसारखे थापून घ्या. नंतर गरम असतानाच कालथ्याने वड्या कापा. हे मिश्रण खूप गार झाले की वड्या काढून डब्यात ठेवा.
3 comments:
मला आल्याच्या वड्या खुप खुप आवडतात, चितळेंकडे, जनसेवामधे गेलो असता चांगले १००-२०० ग्राम घेवुन एकावेळी हाणतो. त्या कश्या करतात माहीती नव्हते आता कळले.
What is ricotta cheese ?
अग रोहिणी,
माझ्या कैलिफोर्निआत्ल्या दोन्ही वाहिनी ह्या वड्या करतात , आणि त्यांच्याकडे बदामाची पूड पण घालतात; खूप छान लागतं . रिकोटा चीज़ पेक्षा ज्यास्त आरोग्यकारक होईल अस वाटतं...... .
harekrishnaji aani ugich konitari abhiprayabaddal anek dhanyawaad!
harekrishnaji, ricotta cheese yacha upayog khavyasarkha hoto mhanun ghatle aahe vadyamadhe.
ugich konitari, pudhcya velela badamachi pood ghalun pahin nakki. mi pahilyandach ya vadya kelya aani baryapeki jamlya.
tumchya doghanchya abhiprayabaddal khup chhan vatle! thanks!
Post a Comment