जिन्नस :
बदाम २ वाट्या
दूध थोडेसे
साखर २ वाट्या
साजूक तूप २ चमचे
क्रमवार मार्गदर्शन :
बदाम गरम पाण्यात भिजत घाला. दोन तासानंतर त्याची साले सोला. हे खूप किचकट काम आहे. नंतर बदाम, साखर व थोडे दूध घालून मिक्सर/ब्लेंडर वर त्याची खूप बारीक पेस्ट करा. बदाम बारीक होऊन एकजीव होण्याइतकेच दूध घालावे. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवून त्यात २ चमचे तूप घाला व बदामाची बारीक केलेली पेस्ट घालून मिश्रण कालथ्याने ढवळावे. आता थोडी आच वाढवावी. एकसारखे ढवळत राहावे. काही वेळाने मिश्रण आटायला लागेल व त्याचा गोळा बनायला लागेल. याचवेळी गॅस बंद करा. मिश्रण खाली उतरवा व बराच वेळ कालथ्याने घोटा. काही वेळाने गोळा अजून थोडा घट्ट होईल. एका थाळीला तूपाचा हात लावा व हे मिश्रण त्यावर ओता. सर्व बाजूने एकसारखे थापा. थापताना प्लॅस्टीकचा तूपाचा हात लावलेला पसरट कागद वापरा. मिश्रण गार झाले की वड्या कापा.
8 comments:
जी ललचाये रहा नही जाये
Thanks Harekrishnaji!
रोहिणी, काल केली मी बदाम बर्फी. केल्या केल्या चव जरा पिठाळ लागली आणि वड्याही पडेनात. काहीतरी चुकले असावे असे वाटले. मग म्हटले, आणखी थोडी आटवायला हवी असेल. मग परत कढई खराब करण्यापेक्षा मायक्रोवेव्ह वापरून पाहावे, असे मनात आले. दर अर्ध्या मिनिटाने मायक्रोवेव्ह बंद करून हलवून पाहिले.असे ३ मिनिट केल्यानंतर मिश्रण घट्ट झाले आणि वड्या पडल्या. पण चव एवढी चांगली लागेना.आणखी काहीतरी चुकले असावे असे वाटून बर्फी डब्यात भरून ठेवली. आणि आज खावून पाहिली तर मस्त लागायला लागली. मुरली असावी...हाहा! पाककृतीबद्दल धन्यवाद रोहिणी.
Thanks Nutan, mi pahilyandach kelya vadya :) parat karin tenvha ricota cheese ghalun pahanar aahe. bahutek jast changly hotil ase vatate. kelya ki tula kalvinach. tu karun baghitlyabaddal thanks a lot Nutan!
काय हो, दोन वाटी साखर फार गोड होणार नाही का आणि बदामाची चव लागणार नाही !
आणि साखर कमी झाली आणि तुप जास्त झाले तर बहुतेक करून वड्या पडत नाही असे वाटते.
तुम्ही जसा चित्रात दाखवला आहे तसा पिवळ्सट हीरवी छटा असलेला रंग येत नाही, तुम्ही पिस्ताही घातला होता का.का पीस्त्याची बर्फी वेगळी आहे, तुमचे काय मत आहे ह्यावर .
बदाम अड्कीत्याने थोडे हळुवार पणे कापायचे आणि खवट नाहीत ना ते चव घेउन पाहायचे, ह्याचा फायदा असा की बदामत आत कीड असेल, आळी पडायला लगली असेल तर कापले, तुकडे केले कि लगेच समजते.पदार्थाची शुद्धता वाढ्ते ह्यामुळे. तुम्ही जे म्हणता आहात ना, की साली काढायचे काम वैगरे ते जर बदाम जास्त वेळ म्हणजे ८-१० तास भीजवायचे तर साली अगदी सहज नीघतात आणि बदामाचे सह्जगत्या हताने मधोमध दाबले तरी दोन तुकडे होतात,
hi burphi mi pahilyandach keli aahe,, yaat ajun sudharna havi aahe, pan mala mazi ek maitrin mhanali ki hi burphi chitalyankade milte agadi tashich diste aahe, he matra agadi khare aahe, burphi mhanje thodi ravalach aste,,, yachi taste khup chhan aahe, tumhi dilelya pratisadamule aata ya paddhatine hi burphi mi parat karun pahanar aahe,, yache modification badam vadi kele aahe,, dusrya paddhatine, yach lable madhe paha,, anek dhanyawaad !! pratisadabaddal,, badam garam panyat bhijavale ki lagech saal nighte,
होय, होय तुमच्या बर्फीचा रंग ऐकदम सुरेख आलेला आहे, म्हणून अधिक विचारले
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे केले तर ती चांगलीच होईल, ह्यात शंका नाही.
मी थोडे प्रंमाण कमी जास्त करून पाहीले आणि ह्यवेळेला दुधाबरोबर थोडी साय पण घातली,
पण झाले काय कि कढईत ती खालून लगायला लागली, म्हणून खाली काढली तर वड्या पडेनात
आणि बदाम बर्फी नाही कलाकंद सद्रुश झाले आहे आणि म्हणून तुमचा अनुभव विचारला इतकेच ! काय साखर जरा मर्यादेतच पाहिजे, आणि शक्तीवर्धक सुकामेवा जास्त सध्याच्या काळात.बाकीच्या ज्या वड्या तुम्ही सांगितल्या आहेत त्या मी करून पाहणार आहे, सांगेन तुम्हाला. ऐकमात्र झाले कि मेवांमिठाई बनवण्याबाबत आसलेले ऐक अद्यान कमी झाले, सोप्या आहेत ह्या खरे सांगू का मला वाट्ते खाद्य पदार्थ बनवणे हे तणाव नाहीसे करते
ho, vadi he prakaran jara kichkatach aste,, mazi ek maitrin aahe tichya sasubaini ek sopi paddhat sangitli aahe,, ti mala tine sangitli, tyapramane mi kaju vadi karun pahili, aani tyach paddahatine bakichya vadya karun pahilya tar ekdam chhan jhalya, arthaat vadya parat parat karun pahilya pahijet mhanje mag tyatil khacha khocha kaltat,, thanks for pratisad !!! aani tumhi recipes karun pahata yabaddalhi khup chhan vatle mala,, mi pan aata mazech padarth parat parat karun pahanar aahe mhanje mag tyat perfection yeil,, :) goad padarth mala jast aavdat nahit tyamule jast vela kele jat nahit,
Post a Comment