Tuesday, August 18, 2009
पालक भजी
वाढणी : २ जण
जिन्नस :
बारीक चिरलेला पालक ३ वाट्या
हरबरा डाळीचे पीठ दीड वाटी
लाल तिखट १ चमचा
धनेजीरे पूड १ चमचा
मीठ चवीपुरते
तळणीसाठी तेल
सजावटीसाठी :
बारीक चिरलेला पांढरा कांदा
शेंदरी गाजराच्या पातळ चकत्या (गाजराची साले काढा)
कोथिंबीरीची पाने
क्रमवार मार्गदर्शन : बारीक चिरलेला पालक पाण्याने धूउन चाळणीमध्ये पाणी निथळ्यासाठी ठेवा. चाळणीखाली एक ताटली ठेवा म्हणजे पाणी निथळून ताटली जमा होईल. पाणी निथळले की काही वेळाने चिरलेला पालक एका भांड्यामध्ये घाला. त्यात हरबरा डाळीचे पीठ, लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ घाला. पाण्याने हे पीठ सैलसर भिजवा. भजी चमच्याने सहज कढईमध्ये घालता आली पाहिजेत इतके पातळ पीठ भिजवा. आता मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात भजी तळली जातील इतके तेल घाला. काही सेकंदाने तेल तापेल. भजी तळण्यासाठी तेल जास्त तापावे लागते. ते पुरेसे तापले आहे की नाही याकरता अगदी थोडे भिजवलेले पीठ तेलात घाला. ते जर लगेच वर आले तर तेल पुरेसे तापले असे समजावे. आता या तापलेल्या तेलातले २ मोठे चमचे तेल हे भज्यांच्या पीठात घाला. चुर्र असा आवाज येईल. मग हे भज्यांचे मिश्रण चमच्याने एकसारखे करून घ्या. तापलेल्या तेलात चमच्याने भजी घालून तळा. ही भजी कुरकुरीत व हलकी फुलकी होतात. भजी तळून झाली की ती एका पेपर टॉवेल वर घाला म्हणजे त्यातले तेल निथळून जाईल.
एका डीशमध्ये ही भजी मधोमध ठेवा. व बाजूने गाजराचे काप, कोथिंबीरीची पाने, व चिरलेला कांदा याची चित्रात दाखवल्याप्रमाणे सजावट करा. याचप्रमाणे मेथीची भजीही करतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
धन्यवाद. "चुर्र असा आवाज येईल" हसु आले खूप.
खूप छान आहे तुमचा ब्लॉग....विशेष करून नवीन लागणा झालेल्या गृहिणींसाठी !!!
Very good job....Keep it up !!!
@ rohini
खुपच छान
चुर्र भजिचा वाचतानाच फ़ील आला.
@ निशा
"लागणा"???? :D
हे म्हणजे कशाची तरी "लागण" झाल्यासारखं वाटतंय:D
kiddind take it easy :)
Sadhak, Nisha Bagul, Shinu, abhiprayabaddal anek dhanyawaad!
Post a Comment