Sunday, January 10, 2010

सेलेरी


जिन्नस :

सेलेरी चिरलेली ४ वाट्या
लाल तिखट १ चमचा
धनेजिरे पूड १ चमचा
मीठ चवीपुरते
थोडी साखर
डाळीचे पीठ
तेल
मोहरी, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घालून तेही पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग हळद घालून त्यात चिरलेली सेलेरी घालून परता. झाकण ठेवून २-४ मिनिटांनी काढून परत एकदा भाजी परता. भाजी शिजली की त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर घालून परत एकदा परता व वाफ द्या. नंतर त्यात अगदी थोडे डाळीचे पीठ घालून ढवळा. ही भाजी थोडी चरचरीत लागते. पण एक वेगळी चव छान आहे. त्याच त्याच भाज्या करून कंटाळा येतो म्हणून ही वेगळ्या चवीची भाजी अधून मधून करायला हरकत नाही.

2 comments:

Vijay's Personal Thoughts said...

नमस्कार, आपला blog पाहिला, अतिशय अप्रतिम मांडणी केली असुन असुन खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. आपण परवानगी देत असाल तर यातील काही कॄती माय मराठी संस्थेच्या ई-मासिकात प्रकाशित करु ईच्छितो. संस्थे बद्दल अधिक माहिती करिता www.maimarathi.org येथे भेट द्यावी. कळावे.

Haddock said...

always loved celery