Tuesday, March 02, 2010

कढी



जिन्नस

आंबट ताक २ पेले
अर्धी मिरची चिरून
बारीक चिरलेले आले पाव चमचा
साखर २ चमचे
डाळीचे पीठ २-३ चमचे
थोडी चिरलेली कोथिंबीर १ चमचा
ओल्या नारळाचा खव १ चमचा
तेल २ चमचे
मोहरी, जिरे, हिंग, हळद
लाल तिखट चिमुटभर
मीठ चवीपुरते

मार्गदर्शन : एका पातेल्यात आंबट ताक घाला. आंबट ताकामध्ये डाळीचे पीठ नीट कालवून घ्या. गुठळी होऊन देऊ नका. नंतर त्यात साखर व मीठ घालून ढवळा. हे मिश्रण मध्यम आचेवर तापत ठेवा. दुसरीकडे एक कढलं तापत ठेवा. चांगले तापले की त्यात थोडे तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घाला. नंतर लगेचच त्यात मिरचीचे तुकडे, लाल तिखट व चिरलेले आले घालून ही फोडणी ताकामध्ये घाला. नंतर त्यात कोथिंबीर व ओला नारळाचा खव घाला. नंतर हे सर्व मिश्रण ढवळा व उकळा. गरम गरम कढी थंडीमध्ये प्यायला छान वाटते. गरम भाता बरोबर ही कढी छान लागते. आवडत असल्यास कढी उकळताना त्यात थोडे काकडीचे गोल काप घाला.

10 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

ओल्या नारळाचा चव टाकून कधी कढी केली नव्हती. हा बदल करून पाहिन. धन्यवाद.

BEAUTIFUL BLOG TEMPLATES said...

कढी मला फ़ार आवडते. परंतु मी त्यात हळद घालत नाही. पण हळद घालुनही करुन पाहीन.

iravatee अरुंधती kulkarni said...

छान आहे रेसिपी! करून पाहीन नक्की!! :-)
अरुंधती
--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

vikas said...

noosti recipi wachun tondala paani sootle

rohini gore said...

kanchan, beautiful blog templates, arundhati, vikas abhiprayabaddal anek dhanyawaad!!

kadhi karun paha. tumha sarvanna nakkich aavadel. kadhi garam garam bhatabarobar thandit va pavsalyat khayla khup chhan vatate.

Rekha J said...

काय सही एक नंबर ब्लॉग आहे
एकपेक्ष एक पाककृती आहेत

vikas said...

korde dhanyavad! aamhala watale kadhibhat khayache invitation milel. Aata solkadhichi recipi pan sanga.

Meenal Gadre. said...

बटाटा/ कांदा भजी टाकून केलेल्या मराठी कढी गोळ्यांची रेसीपी टाक ना.
सिंधी कढी ही तशीच. पण आंबट फार असते. गुजराथ मधे ही करतात पण गोडसर.

gulab said...

khup chan zhali kadhi mala khup aavadali

rohini gore said...

thanks gulab