Thursday, September 02, 2010

कडधान्य भिजवणे१ वाटी हिरवे मूग
पाणी

दुपारी किंवा रात्री जेवणासाठी मुगाची/इतर कडधान्याची उसळ करायची असेल तर आदल्या दिवशी सकाळी मूग पाण्यात भिजत घाला त्यावर झाकण ठेवा. रात्री झोपताना पाण्यासकट हे मूग एका चाळणीत ओता. पाणी निघून जाईल. या चाळणीवर मूग पूर्णपणे झाकून जातील असे झाकण ठेवा व चाळणीखाली एक पातेली ठेवा. उरलेले सर्व पाणी निथळून जाईल. दुसऱ्यादिवशी सकाळी मुगाला मोड आलेले असतील. भिजलेल्या एका वाटीचे मोड आलेले मूग ४ वाट्या होतील. ४ जणांकरता उसळ होईल.

4 comments:

Mrudula Tambe said...

ह्या साध्या गोष्टी वाटल्या तरी जर माहिती नसतील तर फजिती होऊ शकते. एकदा मी एका घरगुती समारंभात एक भाजी खाल्ली. तिला मासळी सारखा वास येत होता. नंतर कळले की काबुली चणे जास्ती काळासाठी भिजल्यामुळे असा वास येत होता. खरोखरच अश्या लेखांची भरपुर आवश्यकता आहे.

rohini gore said...

thanks mrudula. je swayampakat agadi navin aahet tyanchyasathi ahsya sathi chhotya pak kruti denar aahe. jase ki phodni kashi karaychi he pan dile aahe.

Shyam said...

रोहिणी ताई रोज विनायक राव-न-ची दृष्ट काढीत जा ..
तुझ्या सारख्या सुगरीणच्या हातचे सुग्रास जेवण ...
जेवल्याने तब्येत अगदी दृष्ट लागण्या सारखी ..राखलीएस ..
मी येथून च तुम्हा दोघांची दृष्ट काढतो ....!!!
keep it up !!!!!!

rohini gore said...

Shyam, abhiprayabaddal anek dhanyawaad!