Tuesday, December 06, 2011

पुरणपोळी

आमच्यात पुरणावरणाचा घाट असतो बरं का! कोणताही सण आला की बाकीचे कोणतेही पक्वान्न असले तरी पुरण हे लागतेच! इति देब्रा! कोब्रा या पुरणावरणाच्या फंदात कधी पडत नाहीत. घाट घालण्याच्या क्रियेत ते जरा लांबच राहतात!





मला पण आठवायला लागेल की मी पुरण किती वेळा आणि केव्हा घातले होते बरे! आठवून काही फायदा नाही. कारण की लांबलचक रेसिपींपासून मी जरा दूरच असते. भारतात असताना जास्तीचे कोणी पाहुणे आले किंवा सणासुदीला तयार श्रीखंडच आणायचे, अमूल व वारणा! या अमुलवारणाचे डबे तर मला खूपच आवडायचे.





अमेरिकेत आल्यावर मात्र बरेच आवडणारे तिखटगोड पदार्थ घरात करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. एकदा माझ्या पंजाबी मैत्रिणीने फोन करून मला सांगितले की मला पुरणपोळी शिकायची आहे आपण करायची का एकदा? मी तुझ्या मदतीला येईन. मी म्हणाले चालेल की! करू या, येत्या होळीच्या मुहूर्तावरच करू. मलाही खूप आवडते! विचार केला या दोघा पंजाबी नवराबायकोबरोबर अजूनही ओळखीच्या चार पाच मित्रमैत्रिणींना बोलावू. मस्तपैकी पुरणावरणाचा घाटच घालू की जो जन्मात कधी घातला नाही!






पंजाबी दोघे जण, दक्षिण भारतीय दोघे जण, आम्ही दोघे व एक मराठमोळा मित्र म्हणजे ७ ते ८ जणांचा पुरणपोळीचा बेत ठरवला. त्यावेळी माझ्याकडे पुरणयंत्र नव्हते, अजूनही नाही. खरे तर पुरण हे पुरणयंत्रातूनच जास्त चांगले वाटले जाते. पुरणयंत्र नसताना पुरणपोळीचा घाट घातला होता.






पुरण जास्तीत जास्त बारीक कसे करायचे यावर एक युक्ती काढली. त्यावेळेला माझ्याकडे भारतातून आणलेला मोठा कुकर होता. त्यात ६ वाट्यांची हरबरा डाळ शिजवली. इलेक्ट्रिक शेगडीवर कुकराला वाफ धरायला अर्धा तास तरी जातोच. कुकराला शिट्या भरपूर केल्या, इतक्या की आतल्या डाळीचा भुगा पडून ती उलट शिट्टीतून बाहेर यायला लागली! नंतर डाळ साखरगुळ घालून शिजवायला कढईत ठेवली. शिजवताना एकीकडे कालथ्याने डाळीवर वार करत राहिले जेणेकरून सर्व डाळ खूप बारीक झाली पाहिजे. मिश्रण छान मिळून आले होते. मिश्रण गार झाले. कणकेलाही चांगलेच तिंबून घेतले होते. आता एवढी सगळी जय्यत तयारी झाल्यावर पोळ्या कशा काय बिघडतील!?






कणकेच्या छोट्या गोळ्याला हातानेच पुरीसारखा आकार दिला. त्यात पुरणाचा साधारण मुठीइतका गोळा भरून पोळी लाटायला सुरवात केली. पोळी लाटली जात होती पण लाटताना भरड लाटली जात आहे हे जाणवत होते. पोळीमधून अगदी छोटे छोटे न शिजलेले डाळीचे बारीक कण पोळीच्या वरती आले होते. पोळी ठिगळ लावलेल्या कापडाप्रमाणे दिसत होती. पूरण शिजले होते पण त्यात खूप छोटे डाळीचे बारीक कण न शिजताच तसेच राहून गेले होते. सर्व पोळ्या करून मग एकत्रच सर्व जेवायला बसणार होतो. कुणीतरी म्हणाल्याचे आठवले की पुरणयंत्र नसेल तर मिक्सर मधून बारीक करता येते. इथले ब्लेंडर म्हणजे काय दिव्यच असतात. पुरण घातले ब्लेंडरमध्ये तर पुरणाचा सगळ्यात खालचा थर फिरत होता. वरचा थर' जैसे थे' स्थितीत होता. म्हणतात ना की काम बिघडले तर कामात काम अजूनच वाढत जाते. मिक्सरमध्ये पुरण बारीक झाले नाहीच, शिवाय मिक्सर धुण्याचे एक काम वाढले.






मैत्रिणीला सांगितले की या पुरणामधले सर्व न शिजलेले डाळीचे बारीक कण वेगळे करायला घे. मला जाम वैतागायला झाले होते. मैत्रीण म्हणाली 'आप क्युं चिंता कर रही है, मै ये काम कर देती हुँ अलग करनेका' काम खूपच किचकट होऊन बसले होते. ती मैत्रीण आरामात एका परातीत पुरण घेऊन न शिजलेले कण बाजूला करत होती. एकीकडे दूरदर्शन बघत होती. मी मनात 'अगं बाई ही वेळ आरामात दूरदर्शन बघून तांदूळ निवडण्याची नाहीये. युद्धपातळीवर कामे व्हायला हवीत.' मग मी पण अर्धे मिश्रण एका परातीत घेतले आणि दोघींनी मिळून डाळीचे बारीक कण अलग करण्याचे काम करत राहिलो. तसे काम पटकन झाले आणि एकीकडे हासत राहिलो:D एकमेकींना छोटे कण दाखवत राहिलो, 'ये देख,,, कितने है,,, छोटे कण,,:) ' या डाळीच्या कणांचे अलग करण्याच्या कामात मी जास्त वेळ रेंगाळत राहिले नाही. एकेक करत मी पुरणपोळ्या लाटायला सुरवात केली. आता पुरणपोळ्या मऊसूत छान होत होत्या. दोघे दोघे करत जेवायला बसले. गरम गरम पोळ्यांवर भरपूर साजूक तूप! पोळ्या पटापट संपत होत्या. सगळ्यात शेवटी माझ्या वाटणीच्या गरम पोळ्या घेऊन त्यावर भरपूर साजूक तूप घातले आणि 'आहाहा,,, ' करत पोळ्या खाल्ल्या. मला पुरणपोळी वर भरपूर तूप लागते. पोळीवर तूप तरंगायला हवे.






त्या एपिसोडनंतर मी इतक्या पोळ्या कधीच केल्या नाहीत. आम्हाला दोघांना एक वाटी हरबरा डाळीच्या पोळ्या भरपूर होतात. अजूनही माझ्याकडे पुरणयंत्र नाही. पण माझे काहीही अडत नाही. आता मी हरबरा डाळ शिजवण्या आधी एक तास गरम पाण्यात भिजत घालते आणि मग कुकरामध्ये शिजवते. बाकीचे सर्व तसेच.

11 comments:

Prajaktta said...

hahaa sahich....maja aste ithe ek ek..chan lihila ahes :D

PRAJAKTTA

सौ. अवनी अंकुर राजोपाध्ये said...

पुरणपोळी आख्यान वाचून झाले. एकूण अनुभव वाचून मजा आली. तेव्हा मात्र नक्कीच तुला तो वेळ घाम काढणारा वाटला असेल आणि मुख्यत्वे फजितीचा !
स्वयंपाकातले काही बिघडलेले असले कि अशा प्रकारचे मोठे व्याप त्रासाचे वाटू लागतात. ते म्हणजे खरोखरच एक मोठे काम होऊन बसते. स्वानुभव सांगते, लौकर आलेल्या बायका, नावालाच मदतीला येतात. आल्या तरी, 'मी हे करून घेते' च्या नावाखाली मस्त रेंगाळत रेंगाळत कामे करतात. पण अशा वेळी घरच्या बाईलाच समयसूचकता ठेवून वागावे लागते. अगदी कोणाच्याही घरात असे प्रसंग सर्रास घडत असतात. मदतीला आलेल्या बायका मदत सोडून, बाकी वेळ आपल्याशी गप्पा मारतात.. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यात घरातल्या बाईचा वेळ जातो. नाहीतर सरळ टीव्ही ऑन करून मस्त आवाजात पाहत बसतात. त्याचाही त्रास होतो.

पण त्रासाच्या अनुभवाचा शेवट गोड होणे महत्वाचे ! पुरणपोळ्या शेवटी जमल्या आणि पुरणपोळीचे तंत्र जमले म्हणायचे, आमच्या रोहिणी ताईला.. !!

- सौ. अवनी

rohini gore said...

अवनी, तुझा सविस्तर प्रतिसाद आवडला.. पण फजिती वगैरे काही झाली नाही.. कारण की मी स्वतः जेवणाचे निमंत्रण देते तेव्हा असले घोळ कधीच घालत नाही.. शिवाय कोणी जर मदतीला येऊ का असे विचारले तर 'अजिबात नको' असे सांगते कारण मदतीला कोणी आले तर मला काहीही सूचत नाही.. ही मैत्रिण मागेच लागली मला पु. पो. शिकायचीच आहे तेव्हा ती कशी करायची हे बघण्यासाठी आणि मदतीसाठी पण आली.. पण अगं सगळे काही हासतखेळत चालले होते.. शिवाय पुरणाचा घाट घातला म्हणजे मग माणसे पण जास्त हवीत म्हणून मग अजून २-३ जणांना बोलावले.. ही सर्व जोडपी शिकणारी होती.. नवीन होती त्यामुळे कोणी तशी नावे ठेवली नाहीत इतका गोंधळ होऊन सुद्धा.. ही गोष्ट घडली आहे २००२ मध्ये.. मी जर कोणाला जेवायला बोलावले तर जय्यत तयारी करून सर्व काही तयार ठेवते.. अगदी ताटे वाट्या सर्व काही.. भारतात पण तसेच आणि इथेही त्यामुळे अजिबात घाई गडबड होत नाही.. तू पण मदतीसाठी येतात त्यांच्याबद्दल छान लिहिले आहेस! माझा अंदाज चुकला म्हणजे मला वाटले की इतक्या शिट्या केल्यावर आणि नंतर डाळ साखर एकत्र शिजवायला ठेवल्यावर पूर्ण शिजून डाळीचा पार भुगा होईल.. हाहाहा... ही हरबरा डाळ जाम चिवट असते हे त्यावेळी मला कळाले..गॅसवर स्वयंपाक आणि इलेक्ट्रिक शेगडीवर स्वयंपाक यातही खूप फरक आहे.. मी तर या इलेक्ट्रिक शेगडीचा खूप तिरस्कार करते.. हेहेहे..

prajakta,,, thanks a lot,,, avani prajakta, abhiprayabaddal anek dhanyawaad!

Nisha said...

mast majja aali vachtana

rohini gore said...

Thanks Nisha ! :)

Anonymous said...

Rohini Tai, tumcha Puran polyancha ghat ghatlela vachun far gammat vatli. Sundar vinodi lihila ahe. Pan mi ek suggestion dete, tumchyakade jar puran yantra nasel tar, hi ek goshta tumhi karu shakta. Mi jevha iakde US madhye aale 2005 madhye tevha mazyakade pan puran yantra navhte, ani amhi dar varshi puran ghaltoch, tar mi ek yukti keli, mi aadhi dal bhijat ghatli, ani nantar chan shijvun ghetli, tyanantar chalnit thodi shijaleli dal ghalun mothya paline ghotun ghetli. Pan tyala far vel lagla. Mag tychya pudhchya varshi mi ikde Outlet mall la chakkr marli ani Le Gourmet Chef hya dulakanat mala Puran yntra milale ithe US madhye. I was so happy when I saw that in the stores here. You might get that in other kitchen collection stores here. Puran yantrane barech kaam sope hote.

" पालवी " said...

रोहिणी ..मस्त अनुभव....लिहीले ही उत्तम! खरच तु आत्तच पोळ्या करत आहेस आणि एकीकडे सांगत आहेस असे वाटत होते..
आवडले..
सौ.पल्लवी

rohini gore said...

Thanks ITBA,,, mi baghen aata nakki ithlya stores madhe,,, thanks for complements!

rohini gore said...

Thanks a lottt pallavi ! :)

Anonymous said...

Rohini Tai, Khup majja vatli tumche puran policha anubhav vachun. Me lagna nantar US la yeun jemtem 1 athavda jhaala hota tehvha navryachya mitransathi puran policha motha ghaat ghatla hota. Same situation, puran yantra nahi, blender Indiachya mixerchya todicha nahi va samor 5-6 vatya shijavleli chana dal! :D Maala agdi majhech survaatiche divas athavle! Ata matra amha doghan purtach puran polya karte, dal shijli ki paani nithalun ghete va dal 'hand blender' ni agdi vyavastit vaatun ghete. Hand Blender hya kaama sathi ekdum perfect ahe. Mag sakhar-gul-jaifal-veldoda ghalun me saral microwave madhye puran shijavte. Perfect puran everytime anhi khup bhandi pan nahi padat ghasayla. Ata me kadhich puran yantra miss karat nahi va achanak tharvun pan thodya polya karta yetat.

rohini gore said...

Thanks Anonymous:)