Monday, January 16, 2012

तीळवडी


जिन्नस :


तीळाचे कूट १ वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
गूळ १ वाटी
साजूक तूप १ चमचा


क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात साजूक तूप, गूळ व गूळ भिजेल इतके पाणी घाला. थोड्यावेळाने मिश्रण उकळायला लागेल व त्याचा एक तारी पाक बनेल. एकतारी पाक झाला की गॅस बंद करून लगेच त्यात तीळ व दाण्याचे कूट घालून मिश्रण पटापट ढवळा. २ स्टीलच्या ताटल्यांवर थोडे साजूक तूप पसरवा व त्यावर मिश्रण ओता. हे मिश्रण कोमट झाले की वड्या पाडा.

4 comments:

भानस said...

छान खुटखुटीत दिसत आहेत गं. पटकन उचलून तोंडात टाकावीशी वाटली. :)

rohini gore said...

Thanks Bhagyashree!!! :)

gnaik said...

छान एकदम सोपी

rohini gore said...

Thank you gnaik ! :)