Tuesday, June 18, 2013

कणीक भिजवणे


जिन्नस :
गव्हाचे पीठ ४ वाट्या
पाणी २ वाट्या
गोडतेल मोठाले ५ ते ६ चमचे
पाऊण चमचा मीठ


मार्गदर्शन : एका परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात अर्धा चमचा मीठ घाला. थोडे थोडे पाणी घालून कणीक ओली करा. कणीक ओली करताना एकीकडे चमच्याने सगळ्या बाजूने ढवळत रहा. ४ वाट्या कणकेसाठी २ वाट्या पाणी लागते. आता ही ओली झालेली  कणीक अजूनही थोडीफार कोरडीच असेल. नंतर एक चमचा तेल हातावर घ्या आणि ओली झालेली  कणीक हातानेच एकसारखी करून मळून घ्या व त्याचा गोळा बनवा. हा कणकेचा गोळा बनवताना अजूनही कणकेच्या गोळ्याच्या आजुबाजूला थोडे गव्हाचे पीठ कोरडे राहिलेले दिसेल. त्यात अगदी थोडे पाणी घालून तेही त्या गोळ्यात मिक्स करा. कणकेचा गोळा मळताना एकेक चमचा हातावर तेल घेत राहा व गोळा मळत रहा. आता हा मळलेला कणकेचा गोळा अर्धा तास मुरवत ठेवा. कणकेच्या गोळ्यावर झाकण ठेवा. अर्ध्या तासानंतर परत थोडे हातावर तेल घालून कणकेचा गोळा मळा. आता तुम्हाला कणीक नितळ दिसायला लागेल. नितळ झालेल्या कणकेच्या पोळ्या बनवा.

5 comments:

काल निर्णय said...

खरं तर आईला आणि बायकोला पोळ्या करताना बघितलं आहे अनेकदा, परंतु स्वतःच पोळ्या करून पहाव्यात असा विचार अनेकदा येऊनसुद्धा करण्याचा योग (??) आला नव्हता. तुमचा हा लेख वाचून तो येईल असं वाटतंय!!केल्यावर तुम्हाला कळवेनच!!! :-)

Dr Kalpana Godbole said...

Thanks :)

rohini gore said...

sandeep,, nakki kalva ha ! thank you very much,

Dr kalpana, thanks you !

अपर्णा said...

ही पोस्ट मला दहा वर्षांपुर्वी हवी होती. पण आताही तितकीच उपयोगी आहे. का ते तुम्हाला माहित आहेच :)

rohini gore said...

:) ho aparna mahit aahe,, haha, thanks for comments !