Friday, March 06, 2015

थालिपीठाच्या भाजणीचे घावन


जिन्नस
  • थालिपीठाची भाजणी २ ते ३ मूठी
  • लाल तिखट १ चमचा, हळद अर्धा चमचा, चवीपुरते मीठ
  • अर्धा कांदा बारीक चिरलेला
  • पीठ भिजवण्यासाठी पाणी
  • तेल
 मार्गदर्शन:

 वरील सर्व मिश्रण एकत्र करा व पीठ भिजवा. हे पीठ खूप पातळ भिजवा. गॅसवर तवा तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यावर चमच्याने थोडे तेल टाकून तवाभर पसरवा. नंतर डावेने भिजवलेले पीठ तवाभर  घाला. काही सेकंदाने त्यावर थोडे तेल टाका. शिवाय घावनाच्या कडेनेही तेल टाका. काही सेकंदाने  कालथ्याने घावन सोडवून मग ते उलटवावे. व नंतर परत थोडे तेल घाला व काही सेकंदाने घावन तव्यावरून काढा.

2 comments:

Rishika said...

'थालिपीठाच्या भाजणीचे घावन!' वाह हे तर एकदा करून पाहायलाच पाहिजे. पाहूनच खावेसे वाटतायत..

rohini gore said...

Thanks Rishika ! karun paha nakki,, chavit thoda change mhanun chhan aahe, mi asach prayog karun pahila tar malahi aavadale.