कडक उन्हात वाळवलेला बटाट्याचा कीस
तेल
लाल तिखट
मीठ
साखर
तळलेले दाणे
मार्गदर्शन : कढईत तेल घाला. ते तापले की त्यात वाळलेला बटाट्याचा कीस थोडा थोडा घालून तळा. नंतर तळलेला कीस पेपर टॉवेलवर घाला जेणेकरून जास्तीचे तेल निथळेल. आता दाणे तेलात घालून ते तळून त्यात घाला. गॅस बंद करा. हा तळलेला चिवडा ज्या पेपर टॉवेल वर घातला आहे तो पेपर टॉवेल काढून घ्या. नंतर त्यात चवीनुसार लाल तिखट, मीठ आणि थोडी साखर घालून हा चिवडा हाताने मोडून काढा. हातानेच कालवा म्हणजे सर्व बाजून तिखट मीठाची चव लागेल. हा चिवडा मधवेळेला ऑफीस मधून आल्यावर
खायला उपयोगी पडतो. नंतर चहा हवाच.
उन्हाळ्याच्या दिवसात हा बटाट्याचा कीस भरपूर प्रमाणात वाळवून ठेवता येतो. नंतर केव्हाही तळून चिवडा
बनवता येतो.
बनवता येतो.
मला हा वाळवलेला बटाट्याचा कीस इंडियन स्टोअर्स मध्ये मिळाला. हा चिवडा उपवासाला चालतो.
No comments:
Post a Comment