फेबु नेहमीच त्या त्या दिवशीच्या आठवणी दाखवते. आत्ता पाहिले तर सणाला सजवलेली ताटे दिसली. आणि मी माझ्या ब्लॉगवर पाहिले तर ती ताटे तिथे नव्हती. मी ती लगेच अपलोड केली. काही पदार्थांना लेबल द्यायचे राहिले होते ते पण दिले. माझे मन भूतकाळात गेले. मनोगत मराठी संकेत स्थळ २००५ साली सुरू झाले आणि त्यानंतर काही दिवसांनी तिथे पाककृती विभाग सुरू झाला. मनोगतचे विदागर कोसळल्याने प्रशासकांनी सर्व सदस्यांना आपापले लेखन जतन करून ठेवा हे सांगितले होते. आणि त्यातूनच माझ्या ब्लॉगचा जन्म झाला. २००६ साली मी माझा " उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" हा रेसिपी ब्लॉग सुरू केला. त्यावेळी ब्लॉगचे वारे जोरात वाहत होते. मनोगतचे
सदस्य श्री पेठकर काका यांनी एक चर्चा टाकली होती की आम्ही सर्व पदार्थ
लिहितो तर कोण कोण पदार्थ करून बघतो? त्यावर काही प्रतिक्रियाही आल्या
होत्या. आता ब्लॉग मागे पडत चालले आहेत. युट्युब वर थेट पदार्थ दाखवले जातात. खूप पूर्वी प्रत्येकीकडे एखादे रेसिपीचे पुस्तक असे. काही जणांनी/जणींनी मला पूर्वी सांगितले होते की तुझा ब्लॉग गुगल शोधात सापडला. काहींनी सांगितले की मी तुझा ब्लॉग बुकमार्क करून ठेवला आहे. अर्थात या सगळ्या आठवणी भूतकाळातल्या ! तर मला इथे असे विचारायचे आहे की कोण कोण माझा ब्लॉग फॉलो करते आणि कोणी कोणी यातले पदार्थ करून बघितले आहेत? कमेंट मध्ये लिहा. मुख्यत्वे करून मी सर्व पारंपारिक पदार्थ लिहिले आहेत. मराठी, मद्रासी, पंजाबी, बेकींग, मेक्सिकन, इटालियन या सर्व लेबल्स मध्ये ते ते पदार्थ आहेत. मी ज्याप्रमाणे पदार्थ करते त्याप्रमाणेच सर्व मोजमापे देते. माझी मोजमापे वाटी चमच्याची असतात.
मी पदाथांना दिलेली लेबल्स - मला कोशिंबीर खूप आवडते, मी स्वयंपाकघरात नवीन आहे, भाजी, लाडू, वडी, वडे, पाककृतींची ओळख, मेवामिठाई, बेकींग, पोहे, बाळंतिणीचा आहार, उन्हाळी, पदार्थ, तळलेले पदार्थ, उपवासाचे पदार्थ, खीर, घरगुती औषधोपचार, चमचमीत, डाळीचे पदार्थ, दिवाळीचा फराळ, पेय, दुधापासून बनलेले पदार्थ, इ. इ. Rohini Gore
4 comments:
mi karun pahilya ahet tujhya anek recipes.. ani blog follow pan karte.
- Sau.Avani
Thanks Avani !! :)
Mi vachte tuza blog. Chan lihtes ani khup nigutine sagle karte ase tuzya pakkruti and bakichya likhanavarun vatte.
Thank you so much !!!
Post a Comment