वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
रवा १ वाटी (बारीक अथवा जाड)
टोमॅटो १, अर्धे गाजर, अदपाव वाटी मटार, अर्धा कांदा
१ लहान बटाटा, अर्धी सिमला मिरची, ४-५ श्रावणघेवडा शेंगा
अदपाव भाजलेले दाणे, २ मिरच्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
खवलेला ओला नारळ १ वाटी, अर्धे लिंबू, अर्धा चमचा लाल तिखट,
तेल, मोहरी, हिंग, हळद, जिरे, मीठ, साखर, बारीक शेव
क्रमवार मार्गदर्शन:
सर्वात आधी मध्यम आचेवर रवा किंचीत तांबुस रंग येईपर्यंत भाजून घ्या. . फोडणीमध्ये हिरव्या मिरच्या, लाल तिखट व वरील सर्व भाज्या बारीक चिरून घाला व परतून घ्या. १-२ वाफा देवून शिजवा. नंतर त्यात २ वाट्या पाणी घालून व लिंबू पिळून, चवीनुसार मीठ व थोडीशी साखर घालून कालथ्याने ढवळून एक उकळी
आणा. उकळी आली की त्यात भाजलेला रवा घालून पटापट कालथ्याने ढवळा. गुठळी होऊन न देणे. नंतर त्यावर झाकण ठेवून १-२ वेळा दणदणीत वाफ आणून परत कालथ्याने ढवळा. सांजा मोकळा झाला पाहिजे.
वर दिलेल्या सर्व भाज्या बारीक चिरून (बटाटा, कांदा, मटार, श्रावणघेवडा उर्फ बीन्स, सिमला मिरची, गाजर, टोमॅटो ) साधारण २-३ वाट्या होतात.
अधिक टीपा:हा रंगीत सांजा खाताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर , खवलेला ओला नारळ व बारीक शेव घालून खा. सर्व भाज्या घातल्याने हिरवा, पिवळा, पांढरा, लाल रंग येतो. शिवाय त्यावर कोथिंबीर,ओला नारळ व शेव घातल्याने खायलाही मजा येते.

No comments:
Post a Comment