Tuesday, July 22, 2008

तेलतिखटमीठपोहे


पातळ पोहे २ मुठी चाळून निवडून घ्या. त्यात अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे, मूठभर बारीक चिरलेला कांदा, अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ, ५-६ चमचे कच्चे तेल, पाव चमच्याहून कमी साखर घालून हाताने कालवून घ्या. चमचमीत पोहे तय्यार!!

7 comments:

नूतन said...

रोहिणी,

मस्त आहेत तिखटपोहे. मी आत्त्ताच करून पाहिले. दोघांसाठी केले होते पण एकटीनेच फस्त केले. एकदम चमचमीत आणि सोप्पे.पाककृतीबद्दल शतश: आभारी आहे. आता ४ वाजता भूक लागली कि हेच...

Manaswini said...

रोहिणीताई,

लहानपणीची आठवण आली एकदम. पत्त्यांच्या डावात कोणी हारलं की आम्ही त्याला हीच शिक्षा द्यायचो. की त्याने/तिने कच्चा चिवडा करायचा. तिखट पोहे हे तेच. हारलेला जर 'तो' असेल तर थोडी कांदे-बिंदे कापून द्यायची मदत करायची. मीठ वगैरे घालून द्यायचं.

मजा आली. आज हे घरी आले की खायला काय द्यावे हेच इथे तुझ्या ब्लॉग वर शोधत होते..आणि मला आता छान आयडिया सुचली आहे. असे पोहे ह्यांनी पण बहुतेक बऱ्याच वर्षात खाल्ले नसावेत..सो आज का प्लान यहीच.

आभारी आहे रोहिणीताई. दुपारच्या वेळेत करून खाऊ घालायचे कोणते कोणते पदार्थ असतात, सांगू शकशील का? भेळ/सांडवीच वगैरे झालेत करून. आता तेच तेच बोर होताहेत.

अवनी राजोपाध्ये

rohini gore said...

मी रोज संध्याकाळी काही ना काही खायला करते. पोहे, तिखटमीठाचा शिरा असतोच. पण तेच तेच करून कंटाळा येतो म्हणून मग मी तांदुळाची उकड, बटाट्याचा कीस, भेळ, साबुदाणा खिचडी, गोडाचा शिरा, भाजणीचे थालिपीठ किंवा मोकळ भाजणी करते. कधी कधी दडपे पोहे , पोटॅटो फ्राईड करते, बटाटेवडे करते. thanks for abhipray! :)

Nisha said...

Hi Rohini tai
I have been reading your blogs since last week
I liked all the posts :)

Nisha

rohini gore said...

Thank you very much Nisha!! :)

Subodh Deshpande said...

कांदा काकडी, टोम्याटो बारीक चिरुन घातला तरी चालतो
फक्त तिखटापेक्शा, हळ्द, पुड्चटणी, मेतकुट घातले कि चव चांगली येते
कच्चे शेंगदाणे, तेल नुसते घालण्यापेक्शा, फोडणीत शेंगा, मोहरी घालावी,
पोहे कालवताना त्याबरोबर, दूध, दही, अथवा ताक, जितकी फोडणी तितकेच घातले तर पोहे, नर्म, कडक हौतात
ह्याबरोबर, भरलेल्या मीरच्या, कोहाळ्याचे सांड्गे तळून दीले तर लज्ज्त अजून वाढ्ते
काही जण ह्यापोह्यात तळ्लेले उडदाचे पापड, गव्हच्या कुर्ड्या ही चुरुन घालतात

rohini gore said...

vaa, chhan varnan kele aahe,, tumhi sangitlele sarv ghalun ekada pohe karin,, thanks !