Sunday, August 10, 2008

ओल्या नारळाची चटणी


वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

अडीच वाट्या ओल्या नारळाचा खव,
चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे,
हिरव्यागार मिरच्या २-३
अर्ध्या लिंबाचा रस
मीठ, साखर अर्धा चमचा

क्रमवार मार्गदर्शन:

वरील सर्व मिश्रण मिक्सर/ग्राइंडर मधून बारीक करा. थोडे पाणी घाला म्हणजे मिळून येईल. ही चटणी इडली, बटाटेवडा, मेदुवडा, साबुदाणा वडा यासोबत छान लागते. शिवाय उपवासाला पण चालते आणि सणवारात नैवेद्याच्या ताटात डावीकडे शोभून दिसते.

ही चटणी दह्यामध्ये मिसळून त्यावर तूप/तेल-जिरे- हिंग याची फोडणी दिल्यास अधिक चवदार होते शिवाय पुरवठ्यालाही येते.

माहितीचा स्रोत:स्वानुभव

3 comments:

Manaswini said...

रोहिणीताई,

छान आहे चटणीची कृती.

तुला म्हणून एक गंमत सांगते ह्या चटणीची. आधी इडली केली की ही चटणी करायचे. पण नेहमी काहीना काही मुळे चटणी चुकायची. आंबटपणा यावा म्हणून आधी दही घालायचे. नवरा म्हणायचा, इडलीच्या चटणीत दही नसतं. कंटाळून मग चटणीचा नाद सोडूनच दिला.

काल पुन्हा इडल्या केल्या. आणि सहज म्हणून तुझ्या ब्लॉगवर डोकावले. इडलीच्या चटणीची ही रेसिपी सापडली, आणि करून पाहिली..उत्तम जमून आली आहे, नवऱ्याने पोटभरून इडल्या खाल्ल्या आणि पोटभरून कौतुकही केलंय !

खरं कौतुक तर तुझ्झंच करायला हवं ना..? म्हणून ही कमेंट लिहितेय.

अवनी राजोपाध्ये

rohini gore said...

tu mazya recipes karun baghtes aani chhan utsah vadhvnare abhipray detes. tuze mala khup kautuk vatate avani. thanks a lottt! :)

ऋषिकेश वाघ said...

या चटणी मध्ये जिरे घातले तर आणखी खमंग होते...