Wednesday, April 08, 2009

डाळ पालक

वाढणी : २ जण


जिन्नस :



अडीच ते ३ वाट्या बारीक चिरलेला पालक
अर्धी वाटी तुरीची/मुगाची डाळ
१ लहान टोमॅटो
२ पाकळ्या लसूण बारीक चिरून
चिरलेला जाड कांदा थोडासा
मिरची अर्धी जाड तुकडे करून
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजीरे पूड अर्धा चमचा
मीठ चवीपुरते
फोडणीकरता तेल
मोहरी, हिंग, हळद
१ वाटी पाणी


क्रमवार मार्गदर्शन : चिरलेला पालक चाळणीमध्ये पाण्याने धुवून घ्या व निथळत ठेवा. त्याचवेळेला अर्धी वाटी डाळही पाण्यामध्ये भिजत घाला. साधारण १५ ते २० मिनिटांनी पालकामधले निथळलेले पाणी काढून टाका. पाणी निथळण्यासाठी चाळणीखाली एक ताटली ठेवा. भिजत घातलेल्या डाळीमधले पाणी पण काढून टाका.



आता एक छोटा कूकर मध्यम आचेवर तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यामध्ये तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कांदा व टोमॅटो घालून थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला पालक व तुरीची/मुगाची डाळ घाला. लाल तिखट, धनेजीरे पूड व चवीपुरते मीठ घालून परत एकदा डावेने ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये १ वाटी पाणी घाला. परत एकदा डावेने ढवळून घ्या व कूकरचे झाकण लावा. १ शिट्टी झाली की गॅस बंद करा.



एक चविष्ट व पौष्टीक पळीवाढी भाजी तयार होईल. ही पोळी भाताबरोबर छान लागते. शिवाय नुसती वाटीतून गरम गरम खायलाही छान लागते. ही भाजी तुरीच्या डाळीची जास्त छान लागते.



माहितीचा स्त्रोत : मैत्रिण सौ सुनिता येमुल
मूळ रेसिपीमध्ये मी थोडा बदल केला आहे.

6 comments:

Nutan said...

aajach karuun paahate...

नूतन said...

मस्त झाली. खूप दिवसांनी पालकची वेगळी पाककृती मिळाली. खरेच खूप सोपी आणि पौष्टिक आहे. शिवाय दाल पालक केली कि, पोळी आणि भात दोन्हीबरोबर होते.

नूतन

rohini gore said...

Thank you so much Nutan!!

Swati Thorve said...

Rohini Tai,
Mi hi aajach karun pahili. Mastach zale hoti. Tasa palak aawadat nahi, pan ha option chhan watala. Aata nehmich karat jain . Ekdam sopi aani healthy recipe aahe.

Tula takatali(buttermilk) palak kashi kartat mahit aahe ka?

rohini gore said...

Thanks swati!! bhaji aavadlyabaddal aani kelyabaddal. mazya maitrinila phone karun sangin ki tula aavadli mhanun. karan hi bhaji chi recipe mazya maitrinichi aahe.

takatla palak ithech lihili aahe. tula "bhaji" ya label madhe ti sapdel. phakt ajun mi tyacha photo kadhla nahi tyamule tula neet kalpana yenar nahi ki ti kashi diste te. pan recipe savisttar lihile ahe. ti pan karun bagh tula aavdel. Thans you so much swati!!

Unknown said...

नमस्कार रोहीणी ताई
सर्वप्रथम मराठी मधे रेसेपी दील्याबद्दल तुमचे आभार. मी एका समारंभात डाळ पालक प्रथमच खाल्ले होते आणी माला खुप आवडले पण रेसेपी माहीत नव्हती म्हणुन कधी करू शकले नाही. पण आज तुम्ही दीलेली रेसेपी वाचली आणी जाणवले की कीती सोपी आहे ते. मी नक्की करीन आणी कशी झाली ते पण सांगीन. सगळ्याच रेसेपी खुप छान आहेत आणी मुख्य म्हणजे तुम्ही जे फोटो लावले आहेत ते पाहून तर तोंडाला पानी सुटते.
Great job. Thanx once again

Akshara