Tuesday, March 23, 2010
मेतकूट
जिन्नस :
हरबरा डाळ २ वाट्या
उडदाची डाळ सव्वा वाटी
तांदुळ पाऊण वाटी
गहू व मुगाची डाळ दोन्ही मिळून अर्धी वाटी
वरील सर्व धान्य कढईत वेगवेगळे घेऊन भाजा. आच मध्यम असावी.
मसाला
जिरे १ चमचा
धने अर्धा चमचा
लवंग १० ते १२
वेलदोडे ४
दालचिनी १ तुकडा - १ ते दीड इंच लांबीचा
मोहरी १ चमचा
हिंग पावडर २ चमचे
हळद अर्धी वाटी
सुंठ १ चमचा
मिरे व मेथी मिळून अर्धा चमचा
वरील सर्व मसालाही मध्यम आच ठेवून कढईत भाजा.
भाजलेले सर्व जिन्नस गार झाले की एकत्र करा आणि बारीक दळा. घरघंटीतून दळून आणा अथवा घरी मिक्सरवर पण मेतकूट दळता येते. मेतकूट खूप दिवस टिकते.
मऊभातावर मेतकूट व साजूक तूप घालून छान लागते. शिवाय भडंगमध्ये पण घालतात. आयत्यावेळची चटणी पण होते. मेतकूटामध्ये बारीक कांदा चिरून घाला. चवीनुसार मीठ व थोडी साखर घाला. नंतर दह्यामध्ये घालून ढवळा. आवडत असल्यास वरून फोडणी घाला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
This is good ! I also have the same from aajji.
अगं, काल टिपणी टाकली होती. पण दिसत नाहीये. :( मेतकूट पाहून अगदी तोंडाला पाणी सुटले गं. गरम गरम गुरगुट्या भात, त्यावर मेतकूट व लोणकढी तूपाची धार... अहाहाSSS....!! मस्त मस्त.
गुरगुट्या भात हा शब्द अगदी चपखल गं. माझी आई हाच शब्द वापरते. खूपच छान अभिप्राय आहे तुझा. तुझ्या अभिप्रायाने आईकडल्या मेतकूट तूप भाताची तीव्रतेने आठवण झाली.
अस्मिता, आईने तुला पण दिले का गं मेतकूट. मस्तच!
अस्मिता, भाग्यश्री धन्यवाद!!
Great Articles..
thanks subodh!
Post a Comment