Saturday, April 17, 2010

पास्तावाढणी:२ जणांना

पाककृतीचे जिन्नस:


पास्ता ३ मुठी भरुन नळकांडीच्या आकाराचा किंवा जो आवडेल त्या आकाराचा
चिरलेला कोबी वाटीभर, चिरलेले गाजर १ वाटी
चिरलेली सिमला मिरची १ वाटी
मटारचे दाणे वाटीभर
लसूण २-३ पाकळ्या
चिरलेला कांदा ४ चमचे
टोमॅटो सॉस ४२५ ग्रॅम, (hunt's किंवा spaghetii) जे आवडेल ते
तेल,
तिखट १ चमचा,
धने-जीरे पूड १ चमचा,
मोहरी, हिंग, हळद
मीठ


क्रमवार मार्गदर्शन: सर्वात प्रथम एका कढईत पास्ता पाणी घालून शिजवून घ्यावा. नंतर दुसऱ्या कढईत तेल घालून ते तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करावी. नंतर बारीक चिरलेल्या लसुण पाकळ्या व कांदा घालून नंतर बारीक चिरलेला कोबी, गाजर, सिमला मिरची उर्फ ढब्बू मिरची, व मटारचे दाणे घालून परतून घ्या व मंद वाफेवर शिजवा. (जशी भाजी शिजवतो तसे). नंतर त्यात १ चमचा लाल तिखट, १ चमचा धने-जिरे पूड व चवीप्रमाणे मीठ घालून परता. परतून झाल्यावर त्यात शिजवलेला पास्ता व टोमॅटो सॉस घालून ढवळा. नंतर एक दोन वाफा देऊन परत एकदा नीट ढवळून घ्या.


गरम गरम पास्ता तयार! नंतर आवडीचे एखादे आयस्क्रीम खा. एका वेळचे दोघांचे मस्त जेवण होते.

माहितीचा स्त्रोत : श्री राजेश गोस्वामी

6 comments:

mini said...

photo mast ahe...nakki karun baghen..tas mi kadhi pasta kell nahi..pan ata vatay..ki laukarach kara..thanks for the receipe :)

Barve's said...

Thanks for recipe. me eka imported fine food prducts compani madhy kam karto. Aamhi Pasta, olive oil, sauces, olives & mustard, etc products europ madhun import karto. majhyakade pasta banavanyasathi recipe nasalyamule me pasta banavu shakalo nahi. pan aata matra Mi Hya prakare pasta nakki karup baghen.

Subodh said...

Love articles..

rohini gore said...

thanks subodh!

विशाखा said...

मस्त आहे तुमचा ब्लॉग आणि फोटो अप्रतीम आहेत!

मी पास्ता मधे धने-जीरे, मोहरी घालत नाही, पण तेलात लसूण आणि हिरवी मिरची घालते.म्हणजे थोडी इटालियन चव ही राहते, आणि आपल्याला हवा तसा थोडा तिखटपणाही येतो.

rohini gore said...

Thanks Vishakha!!