Wednesday, April 28, 2010

घारगे

वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

लाल/पिवळा भोपळ्याचा कीस १ वाटी
गूळ १ वाटी
तांदुळाचे पीठ अर्धी वाटी
रवा अर्धी वाटी
कणीक अदपाव वाटी
साजूक तूप अर्धा चमचा

क्रमवार मार्गदर्शन: मध्यम आचेवर कढई ठेवा. कढईत थोडे साजूक तूप घालून भोपळ्याचा कीस व गूळ एकत्र करून शिजवून घ्या. शिजवताना त्यावर ताटली ठेवली तर पटकन शिजतो. शिजल्यावर गरम असतानाच त्या मिश्रणात पूरेल इतकेच तांदुळाचे पीठ, रवा व कणीक घालून व्यवस्थित ढवळा. ढवळल्यावर या मिश्रणाचा गोळा तयार होईल. नंतर अर्ध्या तासाने त्या मिश्रणाचे छोटे गोळे करून ते प्लॅस्टीकच्या कागदावर थोडासा तेलाचा हात लावून जाड थापा. थापताना तेलाचा हात घेऊन थापले तर पटकन थापले जातात. साधारण लहान पुरी एवढ्या आकाराचे हे घारगे तेलात मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या.

यामध्ये घेतलेले गुळाचे प्रमाण थोडे जास्त आहे असे वाटते, कारण खूप गोड झाले. ज्यांना खूप गोड आवडत नसेल त्यांनी गुळाचे प्रमाण निम्मे किंवा पाऊण घ्या.

घारग्यांवर गोठलेले साजूक तूप पसरवून खावे. हे घारगे श्रावणात सोमवारी संध्याकाळी उपास सोडताना नैवेद्याला करतात. ह्याबरोबर भाजणीचे तिखट वडेही करतात. तिखट वडे व गोड घारगे असा नैवेद्य असतो.

5 comments:

भानस said...

माझे अतिशय आवडते. खूप सुंदर लागतात.आई अगदी हटकून करतेच करते. रोहिणी फोटू मस्तच आलाय... पटकन उचलून खावासा वाटतोयं. :)

rohini gore said...

mast lagtat na. yeta jat tondat takayla chhan aahet. aani sajuk tup havech :) vadyan barobar ghage aathvle aani kele. thank you so much bhagyashri!! :)

HAREKRISHNAJI said...

जीव नुसता तडफडातोय, कुणीतरी मला हे खायला घाला रे

rohini gore said...

Thanks Harekrishnaji.

Sharad Nene said...

हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे. याला इंग्रजीत काय म्हणता येईल? फोटो फार छान आले आहेत. मैत्रिणीला फोटो पाठवू शकते का?

माया