Tuesday, May 18, 2010

टोमॅटो सूप
वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

लाल टोमॅटो छोटे ६,
छोटा अर्धा कांदा,
एक छोटा बटाटा
लाल तिखट,
मिरपूड,
साखर, मीठ


क्रमवार मार्गदर्शन: टोमॅटो, कांदा व बटाटा चिरून एका पातेल्यात घाला व त्यात ते बुडतील इतपत पाणी घालून कूकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर त्यातील पाणी एका पातेल्यात काढा. बटाटा व टोमॅटोची साले काढून बटाटे टोमॅटो व कांदा मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर हे मिश्रण गाळणीने गाळून घ्या. नंतर शिजवताना घातलेले पाणी की जे आधिच काढलेले आहे ते पण या गाळलेल्या मिश्रणामधे घाला.


नंतर या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट, मिरपूड, मीठ व साखर घालून एक उकळी आणा. झाले सूप तयार.

टोमॅटो सूपास कांद्यामुळे तिखटपणा व बटाट्यामुळे दाटपणा येतो.

गाळून घेतल्यामुळे टोमॅटोतील बिया व मिक्सरमधे बारीक करताना जर बटाट्याचे तुकडे राहिले असतील तर ते सूपामध्ये येत नाहीत. एकजीव व दाट सूप होते. गरम गरम सूपामध्ये थोडे बटर घाला.माहितीचा स्रोत:बहिण सौ रंजना जेरे

2 comments:

माऊ said...

uttam..karun pahile..mastach jhalele..daatpanasathi me cornflour takat hote pan batata is good for..thnx Rohini

rohini gore said...

Thanks a lot Uma!! batatyane jast daatpana yeto.