Friday, May 07, 2010

भरलेली चिली पोबलॅनो
जिन्नस :

चिली पोबलॅनो २
बटाटे मध्यम २
लाल तिखट अर्धा ते पाऊण चमचा
धनेजिरे पूड अर्धा ते पाऊण चमचा
मीठ
पाव लिंबू
लसूण २-३ पाकळ्या बारीक चिरून
कांदा थोडा बारीक चिरून
तेल
सजावटी साठी किसलेले चीझ

क्रमवार मार्गदर्शन : बटाटे उकडून घ्या. उकडल्यावर त्याची साले काढून हाताने बारीक करा. नंतर त्यात कांदा लसूण अगदी बारीक चिरून घाला. लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ घालून थोडे लिंबू पिळा. हे झाले मिरचीच्या आतमध्ये भरायचे सारण. मिरची धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या व मध्ये एक चिर पाडा. आता तयार केलेले बटाट्याचे सारण चिर पाडलेल्या भागातून मिरचीमध्ये भरा. मध्यम आचेवर पसरट पॅन ठेऊन त्यात थोडे तेल घाला. ते तापले की लगेचच त्यावर भरलेल्या मिरच्या ठेवा. त्यावर झाकण ठेवा. आता आच एकदम मंद ठेवा. मंद आचेवर या मिरच्या शिजतील. अधून मधून झाकण काढून बघावे. नंतर थोड्यावेळाने अलगद मिरच्या उलटा व परत झाकण ठेवा. दुसऱ्या बाजून मिरची शिजेल. आता परत सुलट्या करा व शिजवा. मंद आचेवर मिरची शिजते.

मिरच्या गार झाल्या की एका ताटलीत काढून त्यावर किसलेले चीझ घाला. अशा पद्धतीची मिरची मेक्सीकन उपहारगृहामध्ये मिळते. पण ती उकडलेली असते. व आतील सारणात पण तिखट मीठ नसते. फक्त उकडलेले बटाटे बारीक करून घातलेले असतात. ही मिरची मी इंडीयन स्टाईलने केलेली आहे. जशी आपण भरली सिमला मिरची करतो तशीच पद्धत आहे. याची चव छान लागली. ही मिरची चवीला अगदी थोडी तिखट असते. आणि शिजल्यावर पण छान वास येतो. ही मिरची फ्राईड राईस किंवा मसालेभाताबरोबर छान लागते. नुसती सुद्धा खायला छान लागते.

5 comments:

भानस said...

यस्स्स... ही आणि जरा गडद रंगाची बुटकी मिरची- ती मात्र सणसणीत तिखट असते, मी नेहमी करते. आपण करू तितके व्हेरिएशन या सारणाचे करता येते. रोहिणी,फोटो मस्तच आलेत.

Mahendra said...

रोहिणी
मस्त फोटू!! भुक लागली बघ वाचल्याबरोबर.. आहेस कुठे ? बरेच दिवसानंतर दिसलीस?

जाउ दे, खरं तर मी पण थोडा कमीच होतो नेट वर गेलेल काही दिवस!

rohini gore said...

Mahendra, khup chhan vatle pratisad vachun. mi ithech aahe. net var padik aste. :)

bhagyashri, thanks for comment. chhan vatle!

उर्मी said...

मी भोपळी मिरची मधे हे सर्व सारण भरते आणि चक्क तळते. पार्टी डिश म्हणून मस्त!

अवांतर: मी माहेरची ‘गोरे‘.

rohini gore said...

Thanks Urmi, mi pan ase karun pahin. chhan vatle tu maherchi gore aahes :)