Tuesday, August 09, 2011

बटाटा कीस



जिन्नस :

बटाटे ३
लाल तिखट पाव चमचा
हिरव्या मिरच्यांचे तुकडे ५-६
जिरे पाव चमचा
तेल/तूप फोडणीसाठी
मीठ, साखर,
कोथिंबीर २-३ चमचे चिरलेली
खवलेला ओला नारळ २-३ चमचे
दाण्याचे कूट मूठभर



मार्गदर्शन : बटाटे धुवून घ्या व ते किसणीवर सालासकट किसा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात पुरेसे तेल/तूप घाला. ते तापले की त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की त्यात मिरच्यांचे तुकडे व किसलेला बटाट्याचा कीस घाला. थोडे परता. नंतर त्यावर झाकण ठेवा व काही सेकंदाने झाकण काढा व परता. असे २-३ वेळा करा म्हणजे बटाट्याचा कीस शिजेल. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ , थोडी साखर व दाण्याचे कूट घालून परत नीट ढवळा. झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून त्यात चिरलेली कोथिंबीर व खवलेला नारळ घालून परत एकदा नीट ढवळा. परत झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा व गरम गरम कीस डीश मध्ये खायला घ्या. हा कीस खूपच चविष्ट लागतो. ही उपवासाची डीश आहे.

7 comments:

g ajit said...

बटाट्याचे थालीपीठ --हा पण एक किसाचा च प्रकार आहे पण जास्त लवकर होणारा आहे . बटाट्याच्या किसा मध्ये -कीस न पिळता --मीठ,साखर , दाणा कूट,जिरे पावडर,लाल तिखट,मिरच्या चे तुकडे घालून मळा.आणि तव्या वर तेल/तूप घालून खरपूस भाजा/परता. दोन्ही बाजूने.-जर जिरे पावडर नसेल तर जीर त्या तेल/तुपा वर परता आणि त्या वर थालीपीठ लावा --एकदम instant होते हे.
कमीत कमी मीठ असले तरी होते हे जर ईतर काही वस्तू नसतील तर . जर पाणी सुटू लागले तर ते पण घाला थालीपीठात --त्या मुले एक जीव होते ते .
अजित गद्रे

rohini gore said...

ho ho agadi agadi!! mast lagte he thalipith. mi india trip madhe magchya varshi aaichya hatche khalle aahe. aani instant hote. tyat thode shingad pith kinva upavasachi bhajani ghalyachi mhanje mag mast milun yete. hi pithe fakt milun yanyapurtich ghalaychi, jast nahi. Thanks a lott .. for your Instant Reply! tumhalahi batata kees kinva thalipith khup aavadte ase diste. upavasache sarvach padarth khup chavishtta astat!

भानस said...

ओह्ह! ओला किस टाकला आहेस. मला वाटले आपले बोलणे झा्ले नं तळलेल्या किसाबद्दल तो टाकलास की काय. :)

मला दोन्हीही आवडतात.

rohini gore said...

ho ola kees aahe. unhali valun kelela kees taknar aahe. pan to agadi thoda urlay. jenvha talala hota tenvha tyacha photo gyaycha rahun gela. aata talun mag to takate aani unhali keesachi recipe pan lihite. arthaat ti khupach sopi aahe. ho bhagyashree, malahi donhi kees khupach aavadtat. kiti mast aani chavishtta lagtat na? thanks for comment!! :)

मी मराठी .... said...

mast recipe aahe. Upvas na karnara manus pan upvasala tayar hoil ashi dish mailnaar asel tar...

rohini gore said...

Thank you so much!!

g ajit said...

ho maza batata ha khup awadata padartha aahe . mazi bhaji chi list batata aani kandya nantar sampate.maze kade ek batatyache padarth navache pustak aahe tya madhe batatyachya 100 pk ahet --aapalya mazya comment varil sahamati baddal dhanyavad !!ajit gadre from delaware-usa