
जिन्नस :
चिरलेला पालक २ ते ३ वाट्या
दही मोठे २ चमचे/ ताक पाव ते अर्धी वाटी
मीठ चवीपुरते
साखर १ चमचा
डाळीचे पीठ १ चमचा
दाण्याचे कूट १ चमचा
तेल
मोहरी, हिंग, हळद फोडणीसाठी
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
मिरच्यांचे तुकडे २-४
मार्गदर्शन : एका पातेल्यात चिरलेला पालक घाला व तो कूकरमध्ये शिजवून घ्या. कूकर गार झाला की पालक बाहेर काढा व डावेने नीट ढवळून घ्या. एकजीव करा. पालक एकजीव केल्यावर त्यामध्ये मिळून येण्याइतपतच डाळीचे पीठ व दही/ताक घाला.नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, साखर , मीठ व दाण्याचे कूट घाला. सर्व मिश्रण डावेने एकजीव करा/ढवळून घ्या. नंतर मध्यम आचेवर एक पातेले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. फोडणीत हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून त्यावर पालकाचे तयार केलेले मिश्रण घालून नीट ढवळा. एक उकळी आली की गॅस बंद करा. ही पातळ भाजी गरम भाताबरोबर खूपच छान लागते.
4 comments:
करायला सोपी आणि पौष्टिक ..
hoho agadi! thanks.
दही नव्हते टाकत मी ,आता टाकून पाहिल ! आणि हो मी पोह्याला टाकतो तसे शेंगदाणे टाकते शिजताना !
Thanks geetanjali,,,
Post a Comment