Wednesday, June 27, 2012

बटाटा कचोरी


जिन्नस :
४ मधम आकाराचे बटाटे
मिरच्या २
नारळाचा खव मूठभर
लाल तिखट
कोथिंबीर मूठभर
दाण्याचे कूट मूठभर
मीठ चवीनुसार
साखर अर्धा चमचा
चारोळ्या, बेदाणे, बदामाचे काप ऐच्छिक
साबुदाण्याचे पीठ डावभरक्रमवार मार्गदर्शन : बटाटे कूकरमध्ये उकडून घ्या. कूकर गार झाला की आतील बटाटे एका रोळीमध्ये काढून घ्या म्हणजे जास्तीचे पाणी निथळून जाईल. बटाटे पूर्ण गार झाले की त्याची साले काढून किसून घ्या. बटाटे किसले की त्यात १ मिरची व मीठ वाटून घाला अथवा लाल तिखट अर्धा चमचा व चवीनुसार मीठ घाला. हे सर्व मिश्रण एकजीव करा. ओला नारळाचा खव, कोथिंबीर, दाण्याचे कूट, मीठ व साखर, एका मिरचीचे खूप बारीक तुकडे असे कचोरीत घालायचे सारण तयार करा. त्यात हवे असल्यास चारोळ्या, बदाम काप व बेदाणे घाला. सारण एकत्रित कालवून घ्या.आता बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या व एकेक गोळ्याची कचोरी बनवा. कचोरी बनवताना गोळ्याला तेला/तूपाचा हात घेऊन त्याचा हातानेच नितळ गोळा करा व त्याची पातळ पारी बनवा. या पारीमध्ये ओल्या नारळाच्या खवाचे केलेले सारण बनवा व ही पारी हाताने सर्व बाजूने एकत्र करून पारी बंद करा म्हणजे सारण बाहेर येणार नाही. गोल आकाराच्या कचोऱ्या बनवून घ्या. नंतर एका स्टीलच्या वाडग्यात साबुदाण्याचे पीठ घ्या व या पीठात सर्व कचोऱ्या घोळवून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात तेल/तूप घाला. तेल पुरेसे तापले की  आच मंद ठेवा व तांबूस रंगावर सर्व कचोऱ्या तळून घ्या. या कचोऱ्या उपवासाला चालतात.2 comments:

Ninad Kulkarni said...

तोंडाला पाणी सुटले
यम यम

rohini gore said...

Thank You !