Monday, December 03, 2012

पाचक


जिन्नस :

लिंबाचा रस अर्धी वाटी
किसलेले आले अर्धी वाटी
साखर दीड वाटी
सैंधव मीठ पाव चमच्यापेक्षा कमी


मार्गदर्शन : वरील सर्व मिश्रण एकत्रित करा व चमच्याने ढवळून घ्या. बाटलीत भरून ठेवा. अधुनमधून बाटलीतले हे मिश्रण चमच्याने ढवळत रहा. पित्तशामक पाचक तयार. मळमळत असेल तर पाव ते अर्धा चमचा खा. बरे वाटेल. रोज सकाळी चहाच्या आधी खाल्ले तरी चालते. तोंडाला चव नसेल तर खा. बरे वाटेल.

4 comments:

Panchtarankit said...

पैलतीरी साहेबांच्या देशात अभक्ष्य भक्षण वरचेवर केले जाते त्यामुळे उदराला एखाद्या आयटी बांधवाच्या प्रमाणे प्रचंड काम करावे लागते.
त्याच्या आरोग्यासाठी हे पाचक उत्तम आहे.

rohini gore said...

thanks !

Unknown said...

मला तुमच्या रेसीपी फार आवडतात

rohini gore said...

anek dhanyawaad !!