Wednesday, November 28, 2012

पौष्टिक मुडाखिवाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस :

तांदुळ १ वाटी, अर्धी वाटी मुगाची डाळ, ३ वाट्या पाणी
१ वाटी गाजर व सिमला मिरचीच्या जाड फोडी
१ वाटी मटार, १ वाटी फ्लॉवरची मोठी फुले
१ वाटी जाड चिरलेला कोबी, ४-५ लसुण पाकळ्या, थोडे आले,
२ मिरच्या, बारीक चिरलेला कांदा २ चमचे, मीरपूड अर्धा चमचा, मीठ,
मोहरी, हिंग, जिरे, हळद, फोडणीकरता तेल


क्रमवार मार्गदर्शन: तांदुळ व डाळ पाण्यामध्ये धुवून रोवळीमधे १ तास निथळत ठेवा. नंतर लसूण, आले, मिरच्या व कांदा खूप बारीक चिरा. तेलाच्या फोडणीमधे बारीक चिरलेले आले,लसुण,मिरची,कांदा व मिरपूड घालून २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर चिरलेल्या सर्व भाज्या व डाळ तांदुळ घालून परत २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर या मिश्रणात डाळ तांदुळ प्रमाणाच्या दुप्पट पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून एकसारखे ढवळून घ्या व याची खिचडी करा. कूकरमधे खिचडी केली तर वाफ धरल्यावर लगेच गॅस बंद करा. शिट्टी करायची नाही.

मुडाखि म्हणजेच मुगाच्या डाळीची खिचडी हे सर्वांना माहिती आहेच.अधिक टीपा:गरम व तिखट खिचडी खाताना बरोबर थंडगार दही घ्या. खिचडीबरोबर पाहिजे असल्यास टोमॅटो काकडीचे गोल काप, भाजलेला/तळलेला उडदाचा किंवा पोह्याचा पापड, कैरीचे लोणचे/लिंबाचे लोणचे असल्यास उत्तम !

4 comments:

Anonymous said...

'Mudakhi' ha shabda me pahilyandach vachla, kadhi kaanavar dekhil padla nahi. Kadachit ha khaas Puneri shabd asel :) Punyala barech shabd shortcut karaychi padhat ahe jase ki 'SPDP', 'BhaPo'...ajun ase shabd mahit aslyas nakki saanga.

Shreya

Ugich Konitari said...

saandgi mirchi wisarlaat ka ? :-)

rohini gore said...

sandgi mirchi mastach ! mukhadi shabd puneri nahiye,, maza bhacha vaparto mhanun lihile,

Anonymous said...

Mag tumcha bhacha nakki Punyaat rahat asnar! Eka Puneri maitrinine canteen madhye bolavle va saangitle 'ae TTMM haan' mala kahi kalech na, hey TTMM kaay? mag kalla tila mhanaycha hota ki 'Tujhe Tu (paise de) Majhe Me (dein)' :) Punyaat itki ghai aste ka ho lokana ki dhad 4 shabd suddha bolvat nahit? saaglyaat shortcuts?

Shreya