Thursday, February 28, 2013

भाज्यांचे कटलेट


जिन्नस :

श्रावणघेवडा
सिमला मिरची
गाजर
कोबी
मटार (अर्धी वाटी)
बटाटा १ किंवा २ (साले काढावीत)
लसूण पाकळ्या ४-५
आले छोटा तुकडा
चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे
लाल तिखट १ चमचा
धनेजिरे पूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
मीठ चवीपुरते
कॉर्न प्लोअर २-३ चमचे
तांदुळ पीठ २-३ चमचे
डाळीचे पीठ २-३ चमचे
कॉर्न प्लोअर १ वाटी (घोळण्याकरता)
रवा जाड १ वाटी (घोळण्याकरता)
तेल १ वाटी



मार्गदर्शन : वर लिहिलेल्या भाज्या मध्यम आकाराच्या चिरा. ( ४ ते ५ वाट्या ) व धूऊन घेऊन कूकरमध्ये किंवा मायक्रोवेव्ह मध्ये उकडून घ्या. सोबत बटाटाही उकडून घ्या. उकडलेल्या सर्व भाज्या रोळीत घालून त्या खाली एक ताटली ठेवा. भाज्या पाणी निथळण्यासाठी रोळीत ठेवायच्या आहेत. पाणी सर्व निथळले की सर्व भाज्या एका परातीत घाला. त्यात बटाटा किसून घाला. नंतर यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ व चिरलेली कोथिंबीर घाला. लसूण पाकळ्या, आले यांचे सुरीने खूप बारीक तुकडे करा व तेही सर्व भाज्यांमध्ये घाला. नंतर त्यात डाळीचे पीठ, तांदुळाचे पीठ, व कॉर्नचे पीठ घालून मिश्रण हाताने एकत्रित करा. वर दिलेली पीठे ही भाज्यामध्ये जास्त घालू नयेत. आता या मिश्रणाचे गोल व चपटे गोळे करा. एका ताटात रवा व कॉर्न फ्लोअर पसरून घ्या व त्यात हे गोळे एकेक करून घोळवून घ्या. आता मध्यम आचेवर एक तवा तापत ठेवा. त्यावर २-३ चमचे तेल घालून कालथ्याने पसरवून घ्या. त्यावर एका वेळी ३ ते ४ तयार केलेले कटलेट ठेवून
ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्या. कटलेट उलटले की परत थोडे तेल घालावे. टोमॅटो केचप बरोबर गरम गरम कटलेट खायला द्या. सोबत चहा हवाच !




उकडलेल्या भाज्यातले पाणी निथळूनही त्या जास्त ओल्या वाटल्या तर पेपर टॉवेल वर थोडावेळ घाला म्हणजे बाकीचे उरलेले पाणी शोषून घेतले जाईल. भाज्या जास्त ओल्या नसल्या की मग त्यात अगदी जरूरीपुरतेच वर लिहिलेली पीठे घालावीत.


3 comments:

Subodh Deshpande said...

रगडा प्याटीस चे प्याटीस जसे भाजतात, किंवा परतात तसे करायचे का !
कारण मागे ऐका अशाच कट्लेट च्या पाकक्रुतीत ते तेलात तळा असे दीले होते आणि मी तसे करून पाहीले तर ते वीरायला लागले म्हणून विचारतो

rohini gore said...

होहो, रगडा पॅटीस मधले पॅटीस जसे परततात तसेच हे पण परतायचे. प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद ! करून पाहा आणि कळवा कसे लागतात ते. tumchya navavar click kele tar tumchi profile disat nahi, tumhi blog lihita ka, asel tar vachayla aavadel..

Subodh Deshpande said...

प्रोफाईल अक्टीव्ह केले आहे, पण तुम्ही म्हणता तसे ब्लोग लिन्क ओपेन होत नाहि
माझ्या ब्लोग ची लिंक http://ssabharat.blogspot.in/ अशी आहे.
ब्लोग हा सर्व विषयाकरीता खुला ठेवला आहे, पण स्वयपाकशास्त्र आणि स्वयपाककला ह्यावर काहि लेख नाहित
पण सुप्रसिद्ध स्वयपाककलाकार संजीव कपूर, आणि तुमच्या ब्लोग ची लिन्क त्यावर तुम्हाला सापडेल
त्यामुळे तुम्ही नवीन काही पोस्ट टाकले कि मला कळ्ते