भाजलेल्या सुकामेव्याचे कूट २ वाट्या ( cashews - almonds - pecans - pistachios - hazelnuts)
भाजलेल्या दाण्याचे कूट २ वाट्या
साखर अर्धी ते पाऊण वाटी
साजूक तूप २ ते ४ चमचे
मार्गदर्शन : वरील सर्व जिन्नस एका भांड्यात एकत्र करून चमच्याने एकसारखे करा म्हणजे साखर सर्व बाजूने लागेल
मग हाताने हे मिश्रण एकत्रीत करून लाडू वळा. वरील मिश्रणाचे १८ लाडू होतात. लाडवामध्ये जो सुकामेवा घातला आहे ते डीशमध्ये आहेत.
मग हाताने हे मिश्रण एकत्रीत करून लाडू वळा. वरील मिश्रणाचे १८ लाडू होतात. लाडवामध्ये जो सुकामेवा घातला आहे ते डीशमध्ये आहेत.
टीपा :
साखर घालताना अर्धी वाटी आधी घालावी. नंतर मिश्रण हाताने/चमच्याने एकत्रीत करून आधी चव बघावी. खूपच अगोड वाटले तर परत थोडी घालावी.
साजूक तूप पण २ चमचे आधी घालावे. नंतर सर्व मिश्रण हाताने/चमच्याने कालवून एकत्रीत करून लाडू वळावा. तो जर नीट वळताआला नाही तरच नंतर २ ते ४ चमचे लागेल तितकेच तूप घालावे. लाडू वळण्या इतपतच तूप घालायचे आहे.
जास्त झाले तर तूपकट लागतात.
No comments:
Post a Comment