Saturday, September 23, 2006

बटाटेवडे









वाढणी:४ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

बटाटे ४
कांदा १
मिरच्या ६ तिखट, लसूण पाकळ्या ४ मोठ्या, कोथींबीर १ जुडी, अर्धे लिंबू
डाळीचे पीठ १ वाटी, ३ चमचे मैदा, वडे तळण्यासाठी तेल
मीठ , साखर चवीपुरते
हळद, हिंग

क्रमवार मार्गदर्शन: बटाटे उकडून, त्याची साले काढुन कुस्करुन घ्यावेत. त्यात कांदा, लसुण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबिर खूप बारीक चिरुन घालणे, लिंबू पिळावे. चवीपुरते मीठ व साखर घालावे, व ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करावा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहु देत. ( कांदा व इतर मसाला अजिबात तेलात परतून घ्यायचा नाही, कारण वडे तेलकट होतात शिवाय लसूण,मिरच्या मिक्सरमधुन बारीक करायचे नाही).


डाळीचे पीठ भिजवताना त्यात थोडा मैदा, चवीप्रमाणे तिखट,मीठ घालणे, शिवाय थोडी हळद व हिंग घालणे. बारीक चिरलेली कोथिंबिर आठवणीने घालणे. (गरम केलेले तेल डाळीच्या पिठामधे अजिबात घालायचे नाही, त्यामुळे वडे तेलकट होतात.)

नेहमीप्रमाणे वडे तळणे.


रोहिणी गोरे

3 comments:

Anonymous said...

Hi Rohini,


I have tried your BATATE_WADA recipe many times and it has turned excellent every time
Thanks a lot

~Meghana
meghanakul2000@yahoo.com

rohini gore said...

hey Meghana, mala khupch chhan vatat aahe. karan ki mala batatewade khup priya aahe aani tulahi aavadtat ase diste. abhiprayabaddal anek dhanyawaad!!!

rohini

Anonymous said...

आज माउताई बरोबर ’खादाडी’ बद्दल बोलत असतांना तिने त्यासाठी तुमचा ब्लॉग तिचा सर्वात आवडता आहे अस सांगीतले, आणि तुमच्या ब्लॉगला भेट दिल्यावर माझ मत तिच्यापेक्षा वेगळ राहिलेल नाहीये... :)
खरच खुप सुंदर ब्लॉग आहे तुमचा,आता खादाडीची वर्च्युअल भुक भागवण्याकरता किंवा खादाडीची भौतिक भुक चाळवण्याकरता तुमच्या ब्लॉगला भेट नक्की...