वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
पातळ पोहे ३ वाट्या
कांदा लहान १, तिखट हिरव्या मिरच्या ५,६
कोथिंबीर, खवलेला ओला नारळ, लिंबू,
नारळाचे पाणी
शेंगदाणे
क्रमवार मार्गदर्शन:पातळ पोह्यांवर नारळाचे पाणी आणि लिंबू पिळून हातानेच थोडे कालवून त्यावर झाकण ठेवणे. नंतर त्यामधे कांदा, कोथिंबीर बारीक चिरुन घालणे,नंतर वरुन तेलाची फ़ोडणी घालून पोहे ढवळणे. फोडणीत बारीक मिरच्या चिरुन व शेंगदाणे घालणे.
हे पोहे पातेल्यात परतून करत नाहीत. ह्या पोह्यांना पातळ पोहेच वापरायचे असतात. बाजारात पातळ पोहे आणि जाड पोहे असे दोन प्रकारचे पोहे मिळतात. जाड पोहे रंगीत पोह्यांना वापरतात.
रोहिणी गोरे

2 comments:
पा. कृ शोधायला म्हणून इंटरनेट चालू केले, आणि नकळत, सराईताप्रमाणे तुझ्या ब्लॉगकडे धाव घेतली.
ही कृती छान आहे. आणि पटकन होणारी वाटली.
- मनस्विनी
ता.क.
कोळाच्या पोह्याची कृती येत असेल तर लिही नं..
sorry manaswini kolyache pohe kadhi kele nahit aani khalle pan nahit :)
Post a Comment