Thursday, December 14, 2006

बेसन लाडू






वाढणी:२ जणांना


पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे


पाककृतीचे जिन्नस

हरबरा डाळीचे पीठ १ वाटी
पीठीसाखर १ वाटी
साजूक तूप ६-७ चमचे (पातळ)


क्रमवार मार्गदर्शन: हरबरा डाळीचे पीठ व साजूक तूप कढईत एकाच वेळी घालून मध्यम आचेवर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेणे. सतत ढवळत राहणे नाहीतर पीठ करपेल. भाजून झाल्यावर गॅस बंद करणे. नंतर लगेच त्यात १ वाटी साखर घालून परत हे मिश्रण ढवळून एकसारखे करणे. खूप गार झाल्यावर लाडू वळणे.


ज्यांना कमी गोड आवडते त्यांनी पाउण वाटी साखर घालावी. लाडवामध्ये वेलची पूड किंवा बेदाणे आवडत असल्यास घालणे. नाही घातले तरी चालते. तूपाचे प्रमाण वर दिल्याप्रमाणेच घालावे. पण डाळीचे पीठ पूर्णपणे तूपामध्ये भिजायला हवे, त्याप्रमाणे तूपाचे प्रमाण कमी जास्त करावे. तूप थोडे जास्त झाले तरी चालेल पण कमी नको. १ वाटी डाळीच्या पीठाचे छोटे छोटे आठ लाडू होतात.


रोहिणी गोरे

4 comments:

Manaswini said...

रोहिणी मावशी..
मी खूप दिवसापासून तुझा ब्लॉग फॉलो करतेय..नेहमी म्हणते कि पदार्थ करून पाहीला कि रिप्लाय करीन म्हणून..पण कंटाळा करत होती..
असो..

आज माझा वाढ-दिवस आहे..म्हणून घरच्या घरी गोड म्हणून मी तू सांगितलेल्या पद्धतीने बेला (बेसन लाडू) करून पाहीले..मला बेला खूप म्हणजे खूपच आवडतात..म्हणून..
एकदम मस्त जमले..

तुझा ब्लॉग खूपच छान आहे..पदार्थ छान दिले आहेत..कृती पण सविस्तर आणि नेमकी आहे..बारकावे पण सांगितले आहेस..त्यामुळे माझ्यासारख्या नवशिक्या मुलींना फार फायदा होतो..

नवीन नवीन पदार्थ करायला मला आवडतं..

-मनस्विनी

prpethkar said...



Rohini, tupache pramaan Tsp aahe ki Tbsp?

rohini gore said...

तूपाचे प्रमाण मला आता नक्की माहिती झाले आहे. तूपाचे प्रमाण १ वाटीला अर्धी वाटी तूप (पातळ करुन) मुगाच्या डाळीचे लाडू करून पाहिले. मला तेच जास्त आवडले. प्रतिसादासाठी अनेक धन्यवा ! उत्तरास उशीर लागल्याबद्दल क्षमस्व.

rohini gore said...

Thanks manaswini aand pethkar kaka