दही (Dannon All Natural Plain Yogurt 2 LB)
साखर
वेलची पूड
काजू, पिस्ते, बदाम
साखर
वेलची पूड
काजू, पिस्ते, बदाम
एका कॉटनच्या पातळ कपड्यामध्ये दही घाला. कपडा सर्व बाजुने गुंडाळून घेऊन घट्ट बांधा. व हे बांधलेले गाठोडे एका दांडीला रात्रभर टांगून ठेवा. रात्री ९ वाजता टांगून ठेवले तर सकाळी ९ वाजता त्या दह्याचा चक्का तयार होईल. जेव्हा दही गाठोड्यात बांधाल तेव्हा बाहेरूनच हाताने दाब द्या म्हणजे पाणी निथळून जाईल. असे टांगल्यावर काही तासांनी १-२ वेळेला बाहेरून दाबून पाणी निथळून घ्यावे. सकाळी पण गाठोडे उतरवताना थोडे बाहेरुनच पिळून घ्यावे म्हणजे उरलेले सर्व पाणी निथळून जाईल. शेवटी कपड्याच्या बाहेर दही यायला लागेल इथपर्यंत पाणी निथळू द्यावे.
तयार झालेला चक्का एका पातेल्यात काढून घ्या. जितका चक्का तयार होईल तितकी त्यात साखर घालून ढवळा. २-३ तासाने साखर मिसळलेला चक्का पुरणयंत्रातून काढा अथवा चाळणीतून घोटून घ्या. आता नितळ श्रीखंड तयार होईल. त्यात आवडीप्रमाणे वेलची पूड, काजू बदाम पिस्ते घाला. आवडत असल्यात थोडे केशर गरम करून त्याचा चुरा करून अगदी थोड्या दुधामध्ये मिक्स करून घाला.
वरील दह्यामध्ये साधारण दीड ते दोन वाट्या चक्का होतो. साखर मिसळून ३-४ वाट्या श्रीखंड बनते.
तयार दही नसेल तर दुधाला विरजण लावून घरीच दही बनवा व त्याचा वरील प्रमाणे चक्का तयार करा.
4 comments:
तोंडाला पाणी सुटले ्व्हिगन ्झाल्याचा एक तोटा म्हणजे आता श्रीखंड खाता येत नाही. एका चांगल्या आनंदाला मुकलो.
रवाळ श्रीखंड बनते तेव्हा ते तर आणखीच म्त लागते. आपण श्रीखंडात स्ट्रौबेरीचे बारीक तुकडे घालुन खाल्ले आहे काय ?
thanks harekrishnaji!! yaat grapes, kinva mango pulp kinva hapus ambyache tukde hi chhan lagtat.
नमस्कार रोहिणीताई,
कालच गुढी-पाडव्यानिमित्त ह्याच पद्धतीने श्रीखंड करून पहिले..मस्त झाले होते..mixer मध्ये फेटून घेण्यासाठी थोडे दुध जास्त पडल्या गेले, त्यामुळे थोडे पातळ झाले..पण चक्क्याची (म्हणजेच श्रीखंडाचीच गं) चव स्वादिष्ट झाली होती..नवर्याला पण आवडले.
-मनस्विनी
rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr
Post a Comment