जिन्नस:
टॉरटिला चिप्स (Tostitos)
बटाटावड्याचे सारण
चिंचगुळाचे दाट पाणी
लाल तिखट
धनेजीरे पूड
मीठ
साखर
लिंबू
बारीक शेव
कोथिंबीरीची पाने (सजावटीसाठी)
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो
बटाटावड्याचे सारण: बटाटे उकडून, त्याची साले काढुन कुस्करुन घ्यावेत. त्यात कांदा, लसुण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबिर खूप बारीक चिरुन घालणे, लिंबू पिळावे. चवीपुरते मीठ व साखर घालावे, व ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करावा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहु देत.
सर्वात आधी एका डीशमध्ये कोथिंबिरीची पाने सजावटीसाठी घाला. नंतर एकेक टॉरटीला चिप्स ठेवून त्यात आधी बटाटावड्याचे सारण व चिंचगुळाचे दाट पाणी घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घाला. किंचित लाल तिखट, धनेजीरे पूड पेरा. चवीप्रमाणे थोडे मीठ व थोडी साखरही पेरा. नंतर एकेका पुरीमध्ये थोडी बारीक शेव घाला. नंतर अगदी थोडे लिंबू पिळा.
ह्या चिप्स पाणीपुरीच्या पुरीला एक पर्याय होऊ शकतो. जसे आपण शेव बटाटा पुरी खातो याप्रमाणेच असे करूनही खाता येईल.
4 comments:
चिप्स छान दिसत आहेत. मी सहसा मोड आलेले मुग थोडे फ्राइ करून त्यात कांदा, टोमॅटो, चटणी, शेव वापरते.
मस्त आहेत टॊर्टिला चिप्स.चिप्सचा आकार पण मस्त आहे. काय काय शोध लावशील तू ?
Rohini,
I must say you are a great cook..masala tortilla chips is a really new recipe. I am new to cooking and your blog is helping me a lot. combining tortilla chips and batatawada saran is genius.
Naina
Trupti, tuzya paddhatine pan nakki karun pahin. chhanch lagel. nutan va naina tumcha abhipray vachun khup chhan vatle! Thanks to all!!
Post a Comment