जिन्नस:
१ वाटी शिजलेली तुरीची डाळ
दीड चमचा लाल तिखट
दीड चमचा गोडा/काळा/गरम मसाला
चिंचगुळाचे दाट पाणी अर्धी वाटी
हिरव्या मिरच्यांचे तुकडे ३-४
तेल, मीठ
फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद
थोडी चिरलेली कोथंबीर
थोडा खवलेला ओला नारळ
क्रमवार मार्गदर्शन:
मध्यम आचेवर कढई तापत ठेवावी. नंतर त्यात फोडणीसाठी पुरेसे तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी हिंग व हळद घालून फोडणी करा. लगेच त्यात शिजलेली डाळ डावेने चांगली घोटून घेऊन घाला. लाल तिखट, गोडा/काळा/गरम मसाला जो आवडेल तो किंवा जो उपलब्ध असेल तो घाला. चिंचगुळाचे दाट पाणी व चवीपुरते मीठ घाला. वाटी दीड वाटी पाणी घालून डावेने चांगले ढवळा. नंतर त्यात मिरच्यांचे जाड तुकडे, चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओला नारळ घालून परत एकदा डावेने आमटी ढवळून घ्या. अजून २-३ वाट्या पाणी घाला. आता आच वाढवा व एक चांगली दणदणीत उकळी आणा. थोड्यावेळाने गॅस बंद करा. (आमटी दाट/पातळ जशी हवी असेल त्याप्रमाणात पाणी घालावे.)
आता एका ताटलीत वाफाळलेला गरम गरम भात घ्या. त्यावर गरम गरम आमटी वाढून घ्या. त्यावर साजूक तूप घाला. सोबत कैरीचे लोणचे घ्या आणि खा. बाहेर मुसळधार पाऊस पडत असेल तर हा गरम आमटी भात जरा जास्त खावासा वाटतो.
5 comments:
गरमागरम वाफळलेला आमटीभात खाण्या्सारखे दुसरे सुख नसावे. आणि सोबत कैरीचे लोणचे (लिंबाचे गोड लोणाचे ही चालेल की ) , और क्या चाहिये जीने के लिये.
ऐन पावसाळ्यात धुंवाधार मुसळधार पावसाळ्यात, गच्च धु्क्यात आठदहा तासाच्या पायपीटीने आम्ही जेव्हा भिमाशंकरला पोहोचलो व दमल्या, भुकेल्यापोटी शेगडीवरच्या आमटीभातावर जो ताव मारला आहे त्यापुढे दुनियातील सर्व सुख फिक्की वाटतात.
गोड्या मसाल्याची आमटी अधिक झ्क्कास.
आपल्या बहिणीच्या सासुबाईंनी बनवलेली ही आमटी खाणॆ हे माझ्या बायकोचे एक स्वप्न असते.
पोह्याचा पापड कसा विसरलीस ग ?
Harekrishnaji and ugich konitari Thank you!!
garam aamti bhat aani baher musaldhar paus mhanje agadi khasach. yabarobar, pohyacha papad, lonche n batatyachya kachrya aani chikodyahi!! shivay lasnachi laal tikhat ghalun keleli jhanjhanit chatani pan!
goda masala, kala masala, garam masala yabaddal please sanga.
kala masala aani garam masala ha ekach. khup tikhat asto. goda masala kami tikhat asto. baki ingredients sarv masalyan madhe sarkhech. kami jast pramaan. javalpaas sarv sarkhech. naave vegali.
Post a Comment