Friday, January 23, 2009

गाजर टोमॅटो कोशिंबीर

२ लहान लाल टोमॅटो व एक लहान शेंदरी गाजर बारीक चिरा. त्यात एक चमचा दाण्याचे कूट, चिमुटभर लाल तिखट, पाव चमचा साखर, २ चमचे दही व चवीपुरते मीठ घाला. थोडी हिरवीगार कोथिंबीर चिरून घाला. सर्व मिश्रण चमच्याने एकत्रित करा. एक चविष्ट कोशिंबीर तयार होईल!

2 comments:

Ugich Konitari said...

रोहिणी,

दाण्याचे कूट ह्या ऐवजी भाजलेल्या जवसाचे कूट घालून बघ. जवस म्हणजे flax seeds .

nutritionally ज्यास्त चांगलं आणि चव पण छान येते ......

rohini gore said...

javas ghalun karin ekada. chav nakkich chhan lagel. thanks!