दाण्याचे कूट २ वाट्या
साखर १ वाटी
साजूक तूप पातळ ७-८ चमचे
वरील सर्व जिन्नस एकत्र करून लाडू वळा. तूप घालताना आधी थोडेसेच घालावे. मिश्रण एकत्र करून लाडू वळून पाहावा. नीट वळला गेला नाही तर अजून तूप घालावे. जास्त तूप झाले तरीही हे लाडू बेसनाच्या लाडवांप्रमाणे बसतात! दाणे भाजण्याची गरज नाही. भारतात भट्टीतून दाणे भाजून मिळतात. अमेरिकेत भाजक्या शेंगा मिळतात. दाण्याची टरफले काढून कूट करा. असे हे झटपट लाडू तय्यार!
ह्यात थोडा गूळही छान लागतो. खमंगपणा येतो. पूर्ण गुळाचेही छान लागतात. तसेच यात आवडीनुसार सुकामेव्याची पूडही घालू शकता. मनुका बेदाणे घाला. आपापल्या आवडीप्रमाणे सजवा! पण मला फक्त नुसते दाण्याच्या कुटाचेच लाडू आवडतात!
4 comments:
पन्नास वर्षा पूर्वी शांताबाई गोखले यांच्या बालक मंदिरात , नागनाथ पारा जवळ आम्ही रोज एका पुढे--साइकिल - मागे-डबा-अणि-त्यात -आम्ही असे जायचो . आमच्या डब्यात (दप्तारात) बरेचदा दाण्याचा लादू असायचा , पण पूर्ण गुळाचा..... त्याची आठवण झाली !
are vaa, chhan ch aahe aathvan! mi khare tar nusta guL ghalun ladu kele nahit. pan aata nakii karun khaiin. abhiprayabaddal dhanyawaad!
yummy maaza sarwaat aawadicha ladoo aahe
hi manasi! tula pan ha ladu aavadato. wow. Thanks for comment!
Post a Comment