Friday, February 13, 2009

गाजर वडीजिन्नस:


किसलेले गाजर अडीच वाट्या (गाजराची साले काढून घ्या. )
साखर २ वाट्या
रिकोटा चीझ अथवा खवा पाऊण वाटी
साजूक तूप पाव वाटीक्रमवार मार्गदर्शन:मध्यम आचेवर एका कढईत साजूक तूप व किसलेले गाजर घालून परतून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेवा म्हणजे वाफेवर गाजर शिजेल. झाकण काढून परत एकदा कालथ्याने परता. असे २-४ वेळा करा म्हणजे गाजर व्यवस्थित शिजेल. गाजर शिजण्याकरता पाण्याचा वापर करू नका.आता हे शिजलेले गाजर एका भांड्यात काढून ठेवा. त्याच कढईत २ वाट्या साखर घाला. साखर पूर्णपणे बुडून अगदी थोडे वर राहील इतके पाणी घाला. आच मध्यम असू देत. साखर विरघळायला लागेल. एकीकडे चमच्याने हलवत रहा. व अधुनमधून यातले काही थेंब एका वाटीत काढून पाक कसा होत आहे त्याचा अंदाज घ्या. एकतारी पाक करा. एकतारी पाक झाला की २-३ मिनिटांनी त्यात शिजवून घेतलेले गाजर व रिकोटा चीझ घाला. रिकोटा चीझ घट्ट असते ते कालथ्याने पूर्णपणे मोडून घ्या. कालथ्याने हे मिश्रण ढवळत रहा. या मिश्रण काही वेळाने खूप उकळायला लागेल.आता थोडी आच वाढवा. आता हे मिश्रण एकत्र होऊ लागेल व आटायला लागेल. हे मिश्रण खूप आटवायला लागते. त्याकरता कालथ्याने सतत ढवळावे लागते. काही वेळाने हे मिश्रण कोरडे पडायला लागेल. आता गॅस बंद करा व बाजूच्या शेगडीवर कढई ठेवून सतत हे मिश्रण ढवळ रहा. काही वेळाने या मिश्रणाचा कोरडा गोळा तयार होईल. आता हा गोळा एका तूप लावलेल्या ताटलीत काढून तो लगेच एकसारखा थापा. थापण्याकरता एक पातळ प्लॅस्टिकचा कागद तूपाचा हात लावून घ्या. मिश्रण कोमट झाले की वड्या पाडा. खूप गार झाल्यावर वड्या डब्यामध्ये काढून ठेवा.
वड्या पहिल्यांदाच करत आहे. प्रयोग चालू आहेत त्यामुळे सफाई थोडी कमी आलेली आहे. पण या वड्या खायला खुसखुशीत लागतात. व गाजराच्या असल्याने रंगही छान येतो.

3 comments:

नूतन said...

किती छान दिसत आहेत गाजरवड्या! मांडणी पण खूप सुरेख आहे. रिकोटा चीझ मिळाले तर नक्की करून पाहीन.

meenal said...

Rohinitaai, tu kaju -vadi ani gajar- vadimadhe cheese ka ghatle ahes ? tyane nemke kay hote?

rohini gore said...

Khavyala substitute mhanun ithe Rikotta cheese vapartat mhanun ghatle aahe. :) thanks.