Tuesday, February 24, 2009

टोमॅटो कांदा कोशिंबीरजिन्नसः


लाल टोमॅटो २ लहान आकाराचे
कांदा अर्धा
हिरव्या मिरच्यांचे तुकडे २-३
चिरलेली हिरवीगार कोथिंबीर
दाण्याचे कूट १ चमचा
मीठ
साखर पाव चमचाक्रमवार मार्गदर्शन : टोमॅटो व कांदा खूप बारीक चिरा. त्यात दाण्याचे कूट, चवीप्रमाणे मीठ, थोडी साखर व थोडी कोथिंबीर घाला. मिरच्यांचे तुकडे हाताने चुरडून घाला. सर्व मिश्रण एकसारखे ढवळा. एक चविष्ट कोशिंबीर तयार होईल. बटाट्याच्या काचऱ्या व पोळीबरोबर ही कोशिंबीर जास्त छान लागते.
2 comments:

ugich konitari said...

mugachya dalichi khichadi tevdi missing ahe......

rohini gore said...

ho, agadi barobar :)