Thursday, November 19, 2009

तांदुळाच्या पीठाचे धिरडे

जिन्नस : तांदुळाचे पीठ ४ ते ५ डाव चवीपुरते मीठ तेल पाणी ३-४ ग्लास क्रमवार मार्गदर्शन : तांदुळाच्या पीठात चवीपुरते मीठ घालून पीठ पातळ भिजवा. गुठळी होऊन देऊ नका. पीठ आमटीसारखे पातळ भिजवा. नंतर मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तो जरूरीपुरता तापला की त्यावर चमच्याने तेल घाला व कालथ्याने तेल तवाभर पसरवून घ्या. आता तांदुळाच्या पीठाचे धिरडे तव्यावर घाला. हे पीठ डावेने वरून घालावे. पीठ सैल असल्याने ते आपोआप जितके पसरेल तितकेच पसरू दे. हे पीठ तव्यावर घातल्यावर डावेने पसरू नये. डावेला ते चिकटते. काही सेकंदाने धिरड्यावर व धिरड्याच्या सर्व बाजूने तेल सोडा व काही वेळाने धिरडे कालथ्याने उलटा. उलटल्यावर परत एकदा तेल घालून मग ते तव्यावरून काढा. हे पीठ पातळ असल्याने तव्यावर पसरून त्याला जाळी पडते. दुसरे धिरडे घालताना परत एकदा पीठ डावेने ढवळून घ्या. पीठ घट्ट वाटल्यास परत एकदा थोडे पाणी घाला. हे धिरडे बटाट्याच्या काचऱ्या किंवा उकडून बटाट्याच्या भाजीबरोबर चांगले लागते. ओल्या नारळाची चटणी किंवा लसूण खोबरे, लसूण दाणे यांची झणझणीत चटणीही छान लागते. सोपे व पटकन करतायेण्यासारखे आहे.

5 comments:

Deepali said...

dhanyavaad Rohini Tai...Lagechach hi recipe dilyabaddal...tumachyamule majhyasarkhyanna khup help hote...

Deepali

HAREKRISHNAJI said...

आमच्या घरी आज खायला काय केले असेल ?

HAREKRISHNAJI said...

आमच्या घरी आज खायला काय केले असेल ?

विवेक भाटे said...

नमस्कार! मला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. व्यवसायानिमित्त परगावी राहतो आहे -- 'Forced Bachelor' स्टेटस मध्ये. त्यामुळे पोटापाण्याचे स्वतः तयार करण्याची सवय लावून घेतली आहे. तुमच्या ब्लोगवर विस्तृत माहिती मिळाल्याने जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खूप मदत होते आहे. धन्यवाद! - विवेक भाटे, ग्रेट ब्रिटन...

rohini gore said...

Thank you so much Vivek!!