Tuesday, April 27, 2010

भरड्याचे वडे



वाढणी : २ जण

जिन्नस :

भरड्याचे/भाजणीचे पीठ २ वाट्या
तिखट १ चमचा
हळद अर्धा चमचा
चवीपुरते मीठ
थोडीशी चिरलेली कोथिंबीर

क्रमवार मार्गदर्शन : भरड्याचे पीठ एका ताटलीत घ्या व त्यामध्ये हळद, तिखट, मीठ व चिरलेली कोथिंबीर घालून हे मिश्रण चांगले कालवून घ्या म्हणजे तिखट मीठाची चव सर्व पीठाला लागेल. नंतर एका पातेल्यात २ वाट्या पाणी घालून ते मध्यम आचेवर गॅसवर ठेवा. पाण्याला उकळी आली म्हणजे पाण्याला बुडबुडे आले की गॅस बंद करा. त्यातले थोडे पाणी एका वाटीत बाजूला काढून ठेवा. नंतर त्यामध्ये कालवलेली भाजणी घालून पटापट ढवळा. ढवळताना ओले झालेले पीठ जर कोरडे वाटले तर काढून ठेवलेले पाणी त्यात घाला अन्यथा नको. नंतर त्यावर झाकण ठेवा. २ तास हे पीठ असेच मुरू देत. झाकण ठेवल्याने आतल्या आत जी पाण्याची वाफ आहे त्यात हे मीठ मुरते व शिजते. याला उमले करणे असे म्हणतात.


२ तासाने पीठ थोडे तेल व पाणी घेऊन मळून घ्या व त्याचे छोटे गोळे करा. एका प्लॅस्टिकच्या पातळ कागदावर तेल लावून हे गोळे त्यावर थापून एकेक करून लालसर रंगावर तळा. गोळे थापताना ते मध्यम आकाराचे करा. फार जाड नकोत व फार पातळ नकोत असे थापा. या वड्यांबरोबर लोणी अथवा दही खूप छान लागते. हे वडे घारगे/वडे या नैवेद्यासाठी करतात श्रावणी सोमवरी संध्याकाळी उपवास सोडताना. ही वड्यांची भाजणी वेगळी आहे. या भाजणीला भरडा असेही म्हणतात. कारण हे पीठ जाडसर भरड्यासारखे दळतात. ही थालिपीठाची भाजणी नाही. त्याची रेसिपी लवकरच देईन. मी ही भाजणी भारतातून आणली. इथे इंडीयन स्टोअर्स मध्ये मिळते का नाही ते माहिती नाही. थालिपीठाच्या भाजणीचेही अश्याच पद्धतीने वडे करतात पण त्यात लसूण घालतात. हे वडेही छान लागतात.

8 comments:

भानस said...

पाउस सुरू झाला की हे चटपटीत खाणे हटकून होतेच. मस्तच दिसत आहेत गं... चविष्टही असतीलच. मायदेशातून आलो की असा खजिना काही दिवस तरी जीभेचे चोचले पुरवतोच नं... :)

rohini gore said...

agadi khare aahe. kahi divas tikdun aanlele purte aani mag tya aathvanit divashi khup majet jatat ga. thanks for best reply!

शिनु said...

तोंडाळाआ पाणी सुटले. फ़ोटो तर जाम टेम्पिंग आहे. (डाएटिंगक्या नाना की टांग) पण मुळात या भरड्याची रेसेपीच नाहीए. :(

आता लवकर भरड्याची रेसेपी येऊ दे. वड्यावर कॉपीराईट टाकून रविवारी करता यीएल.

rohini gore said...

thanks shinu, lavkarch lihin bharda recipe. aaila phone varun vicharun lagech lihite. thanks!

Bhagyashree said...

He wade kiti divas tiktil?

rohini gore said...

3=4 divas tikavet ase vatate

Anonymous said...

Bhardyache pith mhanje nakki kasle pith

rohini gore said...

Devdiwalila gharge aani bhardyache vade kartat,, shravanat,, mi aaila vicharun bharda pithachi recipe lavkarach lihin,, sarv dali ekatra ase he pith aste,, pan tyanche praan aaila viharun recipe post karin. thanks a lot for comment !