Wednesday, July 04, 2012

भोपळ्याचे भरीतवाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

लाल/पिवळ्या भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी १५-२०
दाण्याचे कूट ६-७ चमचे,
चिरलेली कोथिंबीर ४-५ चमचे, मिरची १
लाल तिखट व साखर अदपाव चमचा, मीठ
दही ७-८ चमचे
फोडणीकरता तेल २ चमचे, मोहरी, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन: लाल/पिवळ्या भोपळ्याच्या फोडी कूकरमध्ये थोडेसेच पाणी घालून उकडून घ्या. फोडी गार झाल्यावर त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर, साखर, दही व चवीनुसार मीठ घाला. तेलाच्या फोडणीमध्ये एका मिरचीचे तुकडे व लाल तिखट घालून ती फोडणी भोपळ्याच्या फोडींवर घाला व मिश्रण एकसारखे करा. उकडलेल्या फोडी चमच्याने बारीक करा.

उपासाला हे भरीत करतात.

5 comments:

तपवास said...

उपवासाचाच विषय निघालाय म्हणून सांगावेसे वाटले की त्यात काकडीच्या छोट्या छोट्या फोडी घालून चवबदल करून नवीन रमेशसिप्पी तयार करता येतात...

डाळिंबाचे दाणे हळूवार स्प्रिंकल करून अनिवार-शनिवारचे अनिवार्य व्रत आरंभता येते...

अनघा said...

रोहिणी - खाणे आणि खिलवणे हे माझ्या ही आवडीचे विषय आहेत. त्यामुळे तुझा हा पण ब्लॉग मी एकदा सवडीने वाचून काढेन. तू जे फोटो अपलोड करतेस ते ही मस्तच असतात. Keep it up!!!
हे भरीत नक्कीच छान लागत असेल पण थोड्या त्यात सुधारणा सांगू का?
जसं की जर दाण्याच्या कुटा ऐवजी ओला नारळ वापरून बघा.
उपवासाला जर करायचे असेल तर तेला ऐवजी तूप आणि जीऱ्याची फोडणी द्या. हिंग वापरू नका.

rohini gore said...

anagha,, thanks for compliments! naral vaprun pahin nakki.. tup aani jire upavasala kartat,, ho ho, lihayche visrun gele :) tumhalahi khane aani khilavne aavadate he vachun chhan vatle!

tapavas,, anek dhanyawaad,, tumhi sangitlyapramane karun pahin.

SAVITA said...

he bharit olya naralacha khav ghalun bhannatach lagte. upasala toop-jire-mirchichi fodni, naral ani thode dahi ase pan sundarach lagte, ani upasala kakdichya koshimbirit dalimbache dame, ola naral, thodasa limbacha ras, mith, sakhar. kothimbit ani agdi navala mirchi ashi koshimbirhi mastacg. disaylahi ani khaylahi. bagh karun ekda Rohinitai.

rohini gore said...

vaa mastach savita,, nakki karun baghin ashi koshimbeer !! thanks savita