Monday, July 09, 2012

Fajita


जिन्नस :
चिरलेला पालक २ मूठ (पालकाची कोरडी पाने चिरा, ओली नकोत )
एक मोठी सिमला मिरची
एक मध्यम बटाटा
एक लाल टोमॅटो
अर्धा कांदा
एक हिरवी मिरची
फोडणीसाठी तेल
मोहरी हिंग, हळद
लाल तिखट
धनेजिरे पूड
मीठ
किंचित साखरमार्गदर्शन : सिमला मिरची, बटाटा, कांदा, टोमॅटो, मिरची चिरून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली कि त्यात तेल घाला. तेल पुरेसे तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा व त्यात चिरलेली हिरवी मिरची, सिमला मिरची, कांदा, बटाटा,  टोमॅटो घालून परतावे. नंतर एक वाफ द्यावी. नंतर त्यात चिरलेला पालक घालून परतावे. मिश्रण परतत राहावे. नंतर परत एकदा वाफेवर भाजी शिजवून त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड अगदी थोडे चवीपुरते घाला. मीठ चवीपुरते व किंचिती साखर घालून परत ही भाजी परता. आता गॅस थोडा मोठा करून भाजी परतत रहा. ही भाजी थोडी कच्ची ठेवली तर जास्त चांगली लागते. वाफेवर भाजी शिजवताता थोडे पाणी राहील तेही परतून पाणी घालवून टाका. किंवा झाकण ठेवून वाफेवर शिजवली नाही तर सतत शिजेपर्यंत परतत रहा. यात मसाले अगदी चवीपुरते घालायचे आहेत. मूळ भाजीची चव तशीच रहायला हवी. ही मूळ मेक्सिकन पाककृती आहे पण मी इंडियन स्टाईलने केली आहे. गरम गरम ही भाजी जास्त चांगली लागते. पोळीबरोबर भाजी खा.

2 comments:

Anonymous said...

Palak Fajita? Kashi lagte hi bhaaji? Karun pahaychi ichcha ahe pan doubt yetoy chavi baddhal. Hyaat mexican asa kaay ahe nakki? Ka fakta naavach mexican ahe?

Thanks,
Ujwala

rohini gore said...

aamhi mexican restaurant madhe jato tenvha tithe hi dish aamhi nehmi gheto. mexican masale kahi astil tar te ghalat astil,, mi indian masale vaprun hi bhaji banavli aahe,, hi dish muL mexican aahe,, aani tiche naav fajita ase aahe,, hi bhaji paratun kinva ukadun kartat,, bhajichi chav changli aahe,, karun paha,, tumhala kadachit aavadel,,hi bhaji thodi kachchi thevli tar jast changli lagte..