Monday, July 23, 2012
कांदा भजी
जिन्नस :
मोठा कांदा अर्धा
हरबरा डाळीचे पीठ ६ चमचे मोठे
तांदुळाचे पीठ २ चमचे मोठे
तिखट १ चमचा
पाव चमचा हळद
चवीपुरते मीठ
मूठभर चिरलेली कोथिंबीर
तळणीसाठी तेल
पीठ भिजवण्यापुरते पाणी
मार्गदर्शन : कांदा उभा व पातळ चिरा. हरबरा डाळीच्या पीठामध्ये तांदुळाचे पीठ घाला. नंतर त्यात तिखट, हळद, मीठ व चिरलेली कोथिंबीर घालून व पाणी घालून पीठ भिजवा. पीठ खूप पातळ नको व खूप जाड नको. चमच्याने भजी कढईत सहज सोडता येतील इतपत पीठ भिजवा. पीठ भिजले की त्यात चिरलेला कांदा घालून चमच्याने ढवळा. आता कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला. तेल जरा जास्तच घालावे म्हणजे भजी नीट तळली जातात. तेल पुरेसे तापले की त्यात चमच्याने एकेक भजी सोडून लालसर रंगावर तळून ती एका पेपर टॉवेल वर घाला. भजी झाऱ्याने नीट निथळून घ्या. तेल पुरेसे तापले हे बघण्यासाठी भजी तळण्याच्या आधी अगदी थोडे पीठ घालून पहा. चूर्र असा आवाज आला पाहिजे. भजी तळण्यासाठी तेल खूप तापवावे लागते. मध्यम आच ठेवा व भजी तळा. एका बाजूने भजी तळून झाली की भजी झाऱ्याने उलटी करा व दुसऱ्या बाजूनेही भजी लालसर रंगावर तळली गेली पाहिजेत म्हणजे कच्ची राहणार नाहीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
आमच्या वेंगुर्ल्याक बापू च्या हाटेलातल्या भज्यांची सर खयच्याच बज्यांका येनां नाय. म्हणान त्याची पद्धत बघली. तर तो बेसनात पाणी घालणाच नाय. कांदो जर चांगलो असलो आणि बरो बारिक चिरलो तर कांद्याकच पाणी सुटता. म्हंजे कसा आपल्या त्वांडाक पानी सुटता मां. तसा. त्याच्या स्वतःच्या पाण्यातच पीठ चांगला भिजता. आणि मेल्याच्या त्या भज्यांका जी चव येता. ती काय सांगू म्हाराजा.
नाम गुम जायेगा ह्यांनी लिहिलेल्या पद्धतीत तथ्य आहे.
कांदा उभा बारीक चिरून त्याला मीठ लावून ठेवावे. कांद्याला पाणी सुटते. ह्या पाण्यात पीठ भिजवावे.बाहेरून पाणी घालू नये .
असे भिजलेले पीठ घट्ट असते. त्याची खमंग भजी होतात.
कांदा भजी खाताना त्याचे धागे दातात आडकले पाहिजेत.
naam gum jayega aani aniket vaidya,, tumhi dileli recipe mala mahit aahe,, pan mala tashi bhaji aavadat nahit :) khup kordi hotat,, ya paddhatine pan bhaji chhan lagtat,, karun paha,, garam kadkadit telahi ghaltat kinva thoda sodahi ghaltat,, pan tyane bhaji khup telkat hotat,, pith bhijavnyapurtech pani ghalunahi bhjaji chhan hotat,, gol chaktya karunahi bhaji khup chhan hotat,, baryach paddhati aahet,, ji aavadel ti ghyavi ,, nahi ka ? :) thanks for your replies :)
Ithli kanda bhaji anhi tumchya dusrya blog varcha chaha..ekdum hit combination! :)
Thanks !
Tumhi itke chaan chaan padartha banavta. Ekadha post menu planning var karal ka? Kashya barobar kaay changla match hoil hey tumhaala tumchya experience mulay nakkich mahit asel.
ज्याला पकोडा म्हणतात त्यात मोठ्या उभ्या चिरलेल्या कांदयाला तीखट, मीठ, लावून ठेवतात आणि जे पाणी सुट्लेले असते त्यात, थोडे अर्धे शेंगदाणे, आणि बेसन पीठ घालून लगेच तळ्तात ते कडक होतात, ह्याबरोबर ओली पुदीन्याची चटणी सुरेख लागते. ह्यात कांदा दातात अड्कतो जर नीट पीठ लागले नसेल आणि व्यवस्थीत तळला गेला नसेल तर, कारण पकोडा पिवळ्सट रंगाचा असतो तो गडद लाल नसतो
ज्याला कांदाभजी म्हणतात त्यात कांदा लहान अथवा मध्यम आकाराचा उभा चिरलेला घेतात, आणि ज्याप्रंमाणे घोसावळे, कच्चे केळे, बटाटा घालतात आणी ओल्या कालवलेल्या पीठात बूडवून तळ्तात, ह्या मध्ये कांदा, घोसावळे, कच्चे केळे असे जे काही घातले आहे ते आत चांगले शिजणे अपेक्शीत आहे, म्हणजे ती भजी बाधत नाही, ह्या अशा प्रकारच्या भजीचा रंग गडद लाल असतो.
ह्याबरोबर हीरवी शिजवलेली, तळ्लेली, मीरची, अथवा कोरडी, शेंगा, लसूण चटणी चालू शकत्ते
बाहेर पाउस, चहा आणि भजी असेल तर कोणतीच चटणी लागत नाही.
vaa,, khup chhan varnan !!
Post a Comment